Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

IND vs PAK: दुबई येथे झालेल्या १९ वर्षांखालील आशिया कप गट अ सामन्यात भारत आणि पाकिस्तानने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला, परंतु पाकिस्तानी संघ कोणत्याही पातळीवर त्यांच्या खेळाशी जुळवून घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 14, 2025 | 08:01 PM
आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय (Photo Credit - X)

आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भारताचा पाकिस्तानवर ‘धोबीपछाड’!
  • U19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचा ९० धावांनी दणदणीत विजय
  • दीपेश आणि कनिष्कचा गोलंदाजीत कहर
India vs Pakistan U19 Asia Cup: आयसीसी अकादमी, दुबई येथे झालेल्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील ‘ग्रुप-ए’ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ९० धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात एकतर्फी वर्चस्व गाजवले.

आरोन जॉर्जची शानदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६.१ षटकांत २४० धावा केल्या. आरोन जॉर्जने ८५ धावांची शानदार खेळी केली. २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाने भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आणि ते ४१.२ षटकांत केवळ १५० धावांवर ऑल आऊट झाले.

दीपेश आणि कनिष्कचा गोलंदाजीत कहर

पाकिस्तानला ४९ षटकांत २४१ धावांचे लक्ष्य होते, पण त्यांची सुरुवात अत्यंत संथ होती. वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रन याने नवव्या षटकात पहिली विकेट घेत भारतीय संघाला यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने अली हसन आणि अहमद हुसैनला बाद केले. फिरकी गोलंदाज कनिष्क चौहान यानेही गोलंदाजीला आल्यावर उस्मान खानच्या रूपाने पहिली विकेट घेतली. या दोन गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानने केवळ ७७ धावांवर आपली अर्धी टीम गमावली होती.

हे देखील वाचा: BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार

पाकिस्तान १५० धावांवर बाद

हुजैफा अहसनने एका टोकापासून पाकिस्तानी डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला, ७० धावा केल्या, परंतु तो संघाला मानहानीकारक पराभवापासून वाचवू शकला नाही. पाकिस्तानी अंडर-१९ संघ ४१.२ षटकांत १५० धावांवर बाद झाला. भारतीय संघाकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर किशन कुमार सिंग यांनी २ बळी घेतले, तर खिलन पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

गुणतालिकेत भारत अव्वल

पाकिस्तानविरुद्धच्या ९० धावांच्या मोठ्या विजयानंतर भारतीय अंडर-१९ संघाने ‘ग्रुप-ए’ च्या गुणतालिकेत ४ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. त्यांचा नेट रनरेट ३.२४० इतका जबरदस्त आहे. पाकिस्तानचा संघ आता एका विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढील सामना आता १६ डिसेंबर रोजी मलेशिया अंडर-१९ संघाविरुद्ध होणार आहे.

हे देखील वाचा: भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

Web Title: In the asia cup under 19 tournament the indian team registered a resounding victory over pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Dubai
  • IND VS PAK
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20I Toss: टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल
1

IND vs SA 3rd T20I Toss: टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल
2

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल

BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार
3

BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार

U19 IND vs PAK सामन्यात वैभव सुर्यवंशी स्वतात बाद! टीम इंडिया अडचणीत, आयुष म्हात्रे-आरोन जाॅर्जच्या हातात भारताची लाज
4

U19 IND vs PAK सामन्यात वैभव सुर्यवंशी स्वतात बाद! टीम इंडिया अडचणीत, आयुष म्हात्रे-आरोन जाॅर्जच्या हातात भारताची लाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.