Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानचा सामना आज दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. १५६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनने कमालीची खेळी केली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 13, 2026 | 10:32 PM
IND vs AFG: अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या वादळात अफगाणिस्तानचा धुव्वा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

IND vs AFG: अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या वादळात अफगाणिस्तानचा धुव्वा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगला पहिला टी२० सामना 
  • अफगाणिस्ताने केल्या १५६ धावा 
  • अभिषेक शर्मा आणि इशान किशनने ओढला सामना 
IND vs AFG: अझमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर अफगाणिस्ताच्या संघाने २० षटकांत १५६ धावा केल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. ७ षटकांत ४३ धावांवर निम्मा संघ बाद झाला. पण अझमतुल्ला उमरझाई आणि मोहम्मद नबी यांच्यातील सहाव्या विकेटसाठीच्या ८३ धावांच्या भागीदारीमुळे संघाला १५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.

१५६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनने कमालीचा खेळ दाखवला आणि भारताला अत्यंत सुरक्षितपणे जिंकण्याचा उंबरठ्यावर आणले. हा सामना भारतीय संघाने  विकेट्सने जिंकला. पॉवरप्लेमध्येच भारताने ८२ धावा कमावल्या होत्या. त्यामुळे केवळ १३.४ ओव्हरमध्येच भारताने हा सामना आपल्या खिशात घातला.  

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

कसा झाला खेळ 

वैभव सूर्यवंशीला डावलून संजू सॅमसनला आज खेळण्यासाठी मैदानात कर्णधार श्रेयस अय्यरने उतरवले. मात्र केवळ १० धावा करून संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि चाहत्यांना पुन्हा एकदा निराश केले. मात्र सुरूवातीपासून अभिषेक शर्माने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अजिबात डोकं वर काढू दिलं नाही. 

संजू सॅमसन गेल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला आणि अभिषेकनंतर इशान किशन आक्रमक फलंदाजी करताना दिसला. दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांना सामन्यात मजा आणून दिली. अभिषेक शर्माने तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. केवळ ३२ चेंडूमध्ये त्याने ८२ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरशः त्याने रडवले. एका ओव्हरमध्ये तर तब्बल २६ धावा त्याने एकट्याने कुटल्या. अभिषेक पाठोपाठ इशान किशनदेखील ४२ धावांवर आऊट झाला. रशीद खानने एका हाताने कमालीचा कॅच पकडत चाहत्यांचे मन जिंकून घेतले. हा कॅच अत्यंत कठीण होता. 

अर्शदीपची चांगली कामगिरी 

या सामन्यात अर्शदीपने भारतासाठी तीन बळी घेतले. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराने नाणेफेकीदरम्यान जाहीर केले की वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नाही, तर जसप्रीत बुमराह संघात परतला आणि त्यानेही पहिल्याच षटकात पहिली विकेट घेत भारताला चांगली सुरूवात करून दिली. याशिवाय वरूण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली. 

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

Web Title: Ind vs afg 1st t20i live result update india won by 7 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 10:29 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
1

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
2

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
3

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.