Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर जोमात सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला असल्याचे दिसून आले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 13, 2026 | 09:13 PM
भारतीय गोलंदाजांची कमाल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारतीय गोलंदाजांची कमाल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान दरम्यान टी२० चे तीन सामने
  • दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पहिला सामना 
  • भारतीय संघाच्या गोलंदाजांनी केली कमाल कामगिरी 
India vs Afghanistan: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाण फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अगदी पहिल्या चेंडूपासून संघर्ष करत असल्याचे दिसून आले. सात षटकांच्या आतच निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच वंदे मातरम् वाजवण्यात आले. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराने नाणेफेकीदरम्यान जाहीर केले की, वैभव सूर्यवंशी आजच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये नाही, तर जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. भारतीय संघात अनेक खेळाडू दुखापतीतून सावरून परतले आहेत. 

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

पहिल्याच षटकात बुमराहने घेतली विकेट 

भारतीय टीमला पहिल्याच षटकामध्ये जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे विश्वास जिंकत पहिली विकेट मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर वाईडसह ५ धावा दिल्यानंतर जसप्रीतने रहमानुल्लाह गुरबाजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्माने त्याचा कॅच घेऊन भारतीय संघाला आनंद मिळवून दिला. ५ धावांवरच पहिली विकेट अफगाणिस्तानने गमावली होती. गुरबाज हा अत्यंत चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यानंतर ७ षटकातच निम्मा संघ गारद झालेला दिसून आला. 

सर्वच गोलंदाजांची चांगली कामगिरी 

भारताने अफगाणिस्तानला दुसरा धक्का तो इब्राहिम झद्रानच्या रुपात. तो धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १० चेंडूंमध्ये ११ धावा केल्या. ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या २ गडी बाद ३८ अशी होती. त्यानंतर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराहने सेदिकुल्ला अटलचा झेल घेतला. त्याने १३ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. ५ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या ३ गडी बाद ३९ अशी वाईट दिसून आली. 

पहिल्या टी-२० मध्ये अफगाणिस्तानची चौथी विकेटही लवकर पडली. अक्षर पटेलने २ धावा करणाऱ्या गुलबदिन नायबला बाद केले. अफगाणिस्तानची अवस्था यावेळी ४ गडी बाद ४२  अशी होती. अफगाणिस्तान संघाने ७ व्या षटकात आपली पाचवी विकेट गमावली. वरुण चक्रवर्तीने दरबिश रसूलीला त्रिफळाचीत केले. तो फक्त दोन धावा करू शकला. 

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

नबी आणि अझमतने खेळ सांभाळला 

नबी आणि अझमतने डाव सावरण्याचा प्रयत्न करत धावांची अधिक भागीदारी केली आणि खेळ पुढे नेला. दोघांनीही अत्यंत संयमाने अफगाणिस्ताची टीम जास्तीत जास्त धावा करेल याची काळजी घेतली.  मात्र नबीला अर्शदीपने बोल्ड करत धावांचा रथ रोखला. मात्र नबी आणि अझमतीच्या खेळीमुळे १०० धावांचा टप्पा अफगाणिस्तानने पार केला. नबीची विकेट काढल्यानंतर अझमतच्या खेळण्याचा वेगही कमी झाला मात्र त्याने ५० धावा पूर्ण केल्या आणि मैदानात आलेला राशीद खानने तर १० चेंडूचा सामना केल्यानंतर फक्त १ धाव केली आणि अर्शदीपनेच्या गोलंदाजीवर परत तंबूत गेला. केवळ १९ धावा देत अर्शदीपने ३ विकेट्स घेतल्या.  शेवटची ओव्हर श्रेयसने शिवम दुबेला दिली आणि ती महाग ठरली. एका ओव्हरमध्ये २१ धावा अफगाणिस्तानच्या अझमतने काढल्या. 

दोन्ही संघाच्या टीमचे खेळाडू

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमरा, वरुण चक्रवर्ती

अफगानिस्तान: इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज़ (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी

Web Title: India vs afghanistan 1st t20i live score update from delhi arun jaitley stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • indian cricket team
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
1

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
2

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर
3

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट
4

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.