
भारताचा दबदबा, अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत (फोटो सौजन्य - Instagram)
यामध्ये भारताचा स्टार अभिषेक शर्माचे ऐतिहासिक शतक महत्त्वाचे ठरले. याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र अफगाणिस्तानने केवळ १४ ओव्हर्समध्ये ९४ धावा करत हा सामना गमावला. संपूर्ण संघ १०० धावादेखील करू शकला नाही आणि १२७ धावांनी हा सामना हरला.
IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
भारताच्या दणदणीत विजयाचा पाया पहिल्याच डावात घातला गेला. सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि ३४ चेंडूंमध्ये १०८ धावांची धडाकेबाज खेळी केली. अभिषेकचे शतक आणि संजू सॅमसनच्या ५० धावांच्या जोरावर भारताने २२१ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावाच्या अखेरीस भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते.
२२२ धावांचा पाठलाग करताना अफगाण संघ पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळला. २२२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आणि संपूर्ण संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसत होता. अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अफगाण फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची कोणतीही संधी दिली नाही. अफगाणिस्तान नियमित अंतराने विकेट गमावत राहिला आणि त्यांची संपूर्ण फलंदाजी पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली. भारतीय गोलंदाजांच्या घातक कामगिरीसमोर अफगाण संघ पूर्णपणे हतबल दिसत होता आणि भारतीय संघाने १२७ धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेचा शानदार शेवट केला.
रवी बिष्णोईने एकाच षटकात तीन महत्वाच्या विकेट्स घेत अफगाणिस्तानचे उरले सुरलेले कंबरडे मोडून काढले आणि दुसऱ्याच षटकात पुन्हा एक विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला. अफगाणिस्तानचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. ही फ्रेंडशिप मॅच असली तरीही तिन्ही सामने हे भारताच्या बाजूने झाले आणि तेदेखील एकतर्फी झाल्याचे दिसून आले.
IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
आश्चर्याची बाब म्हणजे तिन्ही सामन्यात दोन्ही संघ हे १४ ओव्हर्स खेळले आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यात १४ ओव्हर्समध्ये अफगाणिस्ताने अनुक्रमे दिलेले १५६ आणि १६० धावांचे लक्ष्य भारताने पूर्ण केले आणि तिसऱ्या सामन्यात १४ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानच्या पूर्ण संघाला भारतीय गोलंदाजांनी नेस्तनाबूत केले.