अभिषेक शर्मा अन् संजू सॅमसन (फोटो- सोशल मिडिया)
IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
भारतीय संघाची फलंदाजी
भारतीय क्रिकेट संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने नेहमीच्या शैलीनुसार वादळी खेळी केली. अभिषेक शर्माने वादळी शतक ठोकले. त्याने 34 बॉलमध्ये 108 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याला संजू सॅमसनने चांगली साथ दिली. अभिषेक 108 रन्स करून आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. मात्र तो 2 रन्सवर रन आउट झाला. त्यांनंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. संजू सॅमसनने देखील आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. 50 रन्स करून आउट झाला. तर शिवम दुबेने 14 रन्स केल्या.
1⃣0⃣8⃣ runs
3⃣4⃣ balls
3⃣1⃣7⃣.6⃣5⃣ strike rate
9⃣ fours & 1⃣1⃣ sixes Abhishek Sharma walks back after a fabulous knock 💥💥 Updates ▶️ https://t.co/Zixki4RhPt#TeamIndia | #AFGvIND pic.twitter.com/tMPK8itRXT — BCCI (@BCCI) September 17, 2026
अफगणिस्तान संघाची गोलंदाजी
अफगणिस्तानच्या गोलंदाजांना पहिल्या 9 ते 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट पटकावता आली नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने अफगणिस्तानच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवून दिली नाही. पहिली विकेट राशीद खानने मिळवली. अझमतुल्ला ओमरझाईने संजू सॅमसनला आउट केले. अझमतुल्ला ओमरझाईने शिवम दुबेला आउट करत दुसरी विकेट प्राप्त केली.
अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.
Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.






