Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल येथे  खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 21, 2025 | 06:30 PM
IND VS AUS 2nd ODI: How is India's record at Adelaide? The statistics explain all the math

IND VS AUS 2nd ODI: How is India's record at Adelaide? The statistics explain all the math

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू 
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दूसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल 
  • अ‍ॅडलेड ओव्हल येथे भारताचा रेकॉर्ड चांगला 

India’s record at Adelaide Oval : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS)यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल येथे  खेळला जाणार आहे. भारताला यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मात्र  शुभमन गिल आणि त्याची टीम या मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असणार आहे. हा सामना देखील महत्त्वाचा आहे कारण जर भारताने हा सामना गमावला तर भारताला मालिका गमावावी लागेल. आकडेवारीवरुन दिसून येते की हा सामना भारताच्या बाजूने आहे.

हेही वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये ‘या’ पाच खेळाडूंनी फटकावल्या सर्वाधिक धावा! वाचा खेळाडूंची यादी

अ‍ॅडलेड ओव्हल येथे भारताची कामगिरी

अ‍ॅडलेड ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १५ सामने खेळवले गेले आहेत. या १५ पैकी ९ सामने भारताने आपल्या खिशात टाकले आहेत. अ‍ॅडलेड ओव्हल येथे भारताचा विजयाचा टक्का ६०.०० इतका आहे. भारताने या मैदानावर फक्त ५ सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण ५४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यापैकी ३७ जिंकले आहेत तर १७ गमावले आहेत. अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयाचा टक्का ६८.५१ आहे.

‘या’ भारतीयाच्या सारवधिक धावा…

अ‍ॅडलेड ओव्हलवर सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पहिले नाव महेंद्रसिंग धोनीचे आहे. धोनीने सहा सामन्यांमध्ये १३१.०० च्या सरासरीने २६२ धावा फटकावल्या आहेत.  धोनी या मैदानात  चार वेळा नाबाद राहिला आहे. या मैदानावर धोनीने तीन अर्धशतके देखील झळकवले आहेत.  दरम्यान, विराट कोहलीने चार सामन्यांमध्ये ६१.०० च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या मैदानावर दोन शतके झळकवली आहेत, यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०७ आहे. या मैदानावर परदेशी फलंदाजाकडून सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या इंग्लंडच्या माजी फलंदाज ग्रॅमी हिकसोबत कोहलीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

या मैदानावर भारताची  सर्वोच्च धावसंख्या ७ बाद ३०० आहे. भारताने २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता. अॅडलेडमधील सर्वाधिक धावसंख्या ७ बाद ३६९ आहे, जी ऑस्ट्रेलियाने २६ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरुद्ध उभारली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याट आतापर्यंत १५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ५८ सामने जिंकले आहेत आणि ८५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा विजयाचा टक्का ४०.५५ इतका राहिला  आहे.

Web Title: Ind vs aus 2nd odi indias record is brilliant at the adelaide oval marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा
1

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
2

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11
3

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आकाश चोप्राने केली ICC कडे मागणी! DLS पद्धतीत बदल करा…
4

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आकाश चोप्राने केली ICC कडे मागणी! DLS पद्धतीत बदल करा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.