एडिलेड स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडमध्ये २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना सकाळी ९:०० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. भारताने यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना गमावला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. आता, टीम इंडियाला मालिकेत टिकून राहण्यासाठी अॅडलेड सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भात, अॅडलेडच्या मैदानावर एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज कोण आहेत? या याबाबत जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क अॅडलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. २००३ ते २०१५ दरम्यान, या दिग्गज खेळाडूने अॅडलेडमध्ये १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने ५२.१६ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने क्लार्कने एक शतक आणि तीन अर्धशतके केली आहेत. त्याने या मैदानावर ४२ चौकार आणि चार षटकार लगावले आहेत.
या यादीत दुसऱ्या स्थानी डीन जोन्स आहे. या उजव्या हाताच्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने १९८४ ते १९९२ दरम्यान अॅडलेड येथे १२ सामने खेळले, ११२.६० च्या सरासरीने ५६३ धावा फटकावल्या आहेत. या मैदानावर जोन्सने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९९ धावा देखील केल्या आहेत.
अॅलन बॉर्डर या महान फलंदाजाने १९८० ते १९९३ च्या दरम्यान अॅडलेड येथे एकूण १९ सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने १६ डावांमध्ये ३४.५३ च्या सरासरीने ५१८ धावा काढल्या आहेत. या काळात, बॉर्डरने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकवली आहेत. डावखुऱ्या फलंदाजाने अॅडलेड येथे त्याने ३९ चौकार आणि सहा षटकार खेचले आहेत.
मार्क वॉ या फलंदाजाने १९८८ ते २००२ दरम्यान, वॉने अॅडलेडओव्हल येथे १३ सामने खेळलेले आहेत, ५२.५५ च्या सरासरीने ४७३ धावा काढल्या आहेत. अॅडलेड ओव्हलमध्ये वॉने दोन शतके आणि तीन अर्धशतके लागावली आहेत. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ३६ चौकार आणि एक षटकार देखील मारला आहे.
हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
या स्फोटक ऑस्ट्रेलियन फलंदाजाने २००९ ते २०२२ दरम्यान आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८.६२ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या. या काळात वॉर्नरने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्याने या मैदानावर ४५ चौकार आणि आठ षटकार मारले आहेत.