Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 3rd Day Live Update : विराट कोहलीचे सुवर्ण शतक, कांगारूंचा काढला घाम…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिनाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या संघाकडे २१८ धावांची आघाडी आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2024 | 03:48 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना सुरू आहे. या स्पर्धेचा पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. यामध्ये सध्या सामन्याची दुसरी इनिंग सुरू आहे. यामध्ये भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. भारतासाठी सध्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल दोघे मैदानात टिकून आहेत. या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिनाच्या शेवटपर्यंत दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाकडे २१८ धावांची आघाडी घेतली आहे.

The liveblog has ended.
  • 24 Nov 2024 03:46 PM (IST)

    24 Nov 2024 03:46 PM (IST)

    तिसरा दिनाचा खेळ समाप्त

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिन समाप्त झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने मैदानावर कहर केला आहे. पहिल्या इनिंगच्या खराब कामगिरीनंतर भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने ४८७ धावा ठोकल्या आणि ७ विकेट्स गमावले. आता ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर ५३४ धावांचे लक्ष्य उभे आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगचा खेळ ४८७ धावांवर संपवल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला फलंदाजीचे आव्हान केले आणि टीम इंडियाने १२ धावा देत ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

  • 24 Nov 2024 02:57 PM (IST)

    24 Nov 2024 02:57 PM (IST)

    टीम इंडियाची कमाल, नजर टाका भारताच्या फलंदाजीवर

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत ५३४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर उभे केले आहे.

    • यशस्वी जयस्वाल - १६१ धावा
    • केएल राहूल - ७७ धावा
    • विराट कोहली - १०० धावा
    • नितीश कुमार रेड्डी
    • रिषभ पंत - १ धावा
    • वॉशिंग्टन सुंदर - २९ धावा
    • देवदत्त पडिक्कल - २५ धावा
    • ध्रुव जुरेल - १
  • 24 Nov 2024 02:52 PM (IST)

    24 Nov 2024 02:52 PM (IST)

    टीम इंडियाचे कांगारूंसमोर ५३३ धावांचे लक्ष्य

    भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या समोर पहिल्या कसोटीमध्ये ५३३ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ६ विकेट्स गमावून ४८७ धावा केल्या.

  • 24 Nov 2024 02:48 PM (IST)

    24 Nov 2024 02:48 PM (IST)

    कोहलीने ठोकले करिअरचे ३० वे शतक

    भारताचा स्टार किंग कोहलीने त्याच्या खराब फॉर्ममुळे बऱ्याचदा त्याला ट्रोल करण्यात आले आहे. परंतु त्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कमबॅक करत त्याच्या करिअरचे ३० वे शतक ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीने ७ वे शतक नावावर केले आहे.

    Hello Australia 🇦🇺

    KING KOHLI has brought up his 7th Test century on Aussie soil and second at the Perth Stadium. A classic knock from the champion batter 🫡🫡

    Live - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND | @imVkohli pic.twitter.com/QHMm7vrhcw

    — BCCI (@BCCI) November 24, 2024

  • 24 Nov 2024 02:20 PM (IST)

    24 Nov 2024 02:20 PM (IST)

    नितीश कुमार रेड्डीच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक

    १२९ व्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शला सलग ३ चौकार मारले आहेत. भारताच्या संघाने आता ४९२ धावांची आघाडी घेतली आहे. आतापर्यत भारताच्या संघाने १३० ओव्हरचा खेळ झाला आहे.

  • 24 Nov 2024 02:05 PM (IST)

    24 Nov 2024 02:05 PM (IST)

    भारताने गमावला सहावा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या संघाने सहावा विकेट गमावला आहे. सहावा विकेट वॉशिंग्टन सुंदरचा गमावला आहे सुंदरने संघासाठी २९ धावा केल्या. आता फलंदाजीसाठी नितीश कुमार रेड्डी मैदानात आला आहे.

  • 24 Nov 2024 01:22 PM (IST)

    24 Nov 2024 01:22 PM (IST)

    विराट कोहलीचे अर्धशतक

    भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये नाही त्यामुळे त्याच्या खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता त्याने सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक नावावर केले आहे. विराटने ९४ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या आहेत त्याचबरोबर टीम इंडियाने ४३० धावांची आघाडी घेतली आहे.

    FIFTY!

    A well made half-century by @imVkohli. His 32nd in Test cricket 👏👏

    Fifth on Australian soil.

    Live - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/05HG0XdJKu

    — BCCI (@BCCI) November 24, 2024

  • 24 Nov 2024 12:38 PM (IST)

    24 Nov 2024 12:38 PM (IST)

    तिसऱ्या दिनी दुसरा सेशन समाप्त

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आता दुसरा सेशन समाप्त झाला आहे. यामध्ये आता भारताच्या संघाने ४०५ धावांची आघाडी घेतली आहे. सध्या टीम इंडियासाठी सुंदरने १४ धावा केल्या आहेत तर कोहलीने ४० धावा केल्या आहेत. भारताच्या संघाने आतापर्यत ५ विकेट्स गमावले आहेत.

  • 24 Nov 2024 12:21 PM (IST)

    24 Nov 2024 12:21 PM (IST)

    भारताकडे ४०० धावांची आघाडी

    सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आता भारताच्या संघाने ४०० धावांची आघाडी केली आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट्स गमावून ३५५ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर वॉशिंग्टन सुंदर आणि विराट कोहली टिकून आहेत. विराट कोहलीने ३८ धावा केल्या आहेत तर सुंदरने १२ धावा केल्या आहेत.

  • 24 Nov 2024 11:44 AM (IST)

    24 Nov 2024 11:44 AM (IST)

    भारताने गमावला पाचवा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आता भारताच्या संघाने रिषभ पंतनंतर पाचवा विकेट ध्रुव जुरेलचा गमावला आहे. ध्रुव जुरेल दोन्ही त्याच्या इनिंगमध्ये धावा करण्यात अपयशी ठरला. आता फलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला आहे. पॅट कमिन्सने ध्रुव जुरेलचा विकेट घेतला.

  • 24 Nov 2024 11:37 AM (IST)

    24 Nov 2024 11:37 AM (IST)

    रिषभ पंतने गमावला चौथा विकेट

    भारताचा अनुभवी फलंदाज रिषभ पंत त्याचा विकेट एक धाव करून गमावला आहे. नॅथन लियॉनने त्याला त्याचे शिकार बनवले आहे. आता त्याच्या जागेवर ध्रुव जुरेल मैदानामध्ये फलंदाजीसाठी आला आहे.

  • 24 Nov 2024 11:27 AM (IST)

    24 Nov 2024 11:27 AM (IST)

    टीम इंडियाने गमावला तिसरा विकेट

    IND vs AUS यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने तिसरा विकेट गमावला आहे. मिचेल मार्शने भारताचा खेळाडू यशस्वी जयस्वालचा विकेट घेतला आहे. यशस्वी जयस्वालने भारतीय संघासाठी २९७ चेंडूंमध्ये १६१ धावांची खेळी खेळली. आता चौथ्या विकेटसाठी भारताच्या संघासाठी रिषभ पंत मैदानात आला आहे.

    1ST Test. WICKET! 93.5: Yashasvi Jaiswal 161(297) ct Steven Smith b Mitchell Marsh, India 313/3 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND

    — BCCI (@BCCI) November 24, 2024

  • 24 Nov 2024 11:21 AM (IST)

    24 Nov 2024 11:21 AM (IST)

    भारतीय संघाकडे ३५८ धावांची आघाडी

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या सामान्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ९३ ओव्हरमध्ये ३५८ धावांची आघाडी घेतली आहे. सध्या टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली दोघे फलंदाजी करत आहेत. यशस्वी जयस्वालने १६१ धावा केल्या आहेत तर विराट कोहलीने १५ धावा केल्या आहेत.

  • 24 Nov 2024 10:55 AM (IST)

    24 Nov 2024 10:55 AM (IST)

    यशस्वी जयस्वालची ऑस्ट्रेलियन मैदानावर कमाल

    भारताचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने आजच्या कसोटीच्या तिसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनमध्ये त्याने शतक नावावर केलं, तर दुसऱ्या सेशनमध्ये त्याने आता १५० धावांची खेळी खेळली आहे.

  • 24 Nov 2024 10:41 AM (IST)

    24 Nov 2024 10:41 AM (IST)

    विराट कोहलीची मैदानात एंट्री

    टीम इंडियाने देवदत्त पडिक्कलचा विकेट गमावल्यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आता मैदानात यशस्वी जयस्वालची साथ देण्यासाठी आला आहे. सध्या भारताच्या संघाकडे ३२१ धावांची आघाडी आहे.

  • 24 Nov 2024 10:39 AM (IST)

    24 Nov 2024 10:39 AM (IST)

    देवदत्त पडिक्कलचा गेम ओव्हर

    देवदत्त पडिक्कल बऱ्याच काळापासून संघामध्ये स्थान मिळाले नाही पहिल्या इनिंगमध्ये तो धावा करण्यात फेल झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने २५ धावा केल्या आणि विकेट्स गमावली.

  • 24 Nov 2024 09:56 AM (IST)

    24 Nov 2024 09:56 AM (IST)

    तिसरा दिनाचा पहिला सेशन समाप्त

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिन आहे. यामध्ये आजचा पहिला सेशन समाप्त झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनपर्यत ३२१ धावांची आघाडी घेतली आहे. आतापर्यत भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ८४ ओवरचा खेळ खेळला आहे. आता टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल हे टीम इंडियासाठी फलंदाजी करत आहेत. यशस्वी जयस्वालने आतापर्यत १४१ धावांची खेळी खेळली आहे तर देवदत्त पडिक्कलने २५ धावा केल्या आहेत.

  • 24 Nov 2024 09:37 AM (IST)

    24 Nov 2024 09:37 AM (IST)

    भारताच्या संघाने घेतली ३०० धावांची आघाडी

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने ३०० धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल हे सध्या मैदानामध्ये टिकून आहेत. आतापर्यत ८० ओव्हरचा खेळ झाला आहे.

  • 24 Nov 2024 08:27 AM (IST)

    24 Nov 2024 08:27 AM (IST)

    यशस्वीची साथ देणार देवदत्त पडिक्कल

    केएल राहुलच्या विकेटनंतर आता मैदानामध्ये यशस्वी जयस्वालची साथ देण्यासाठी भारताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल आला आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या अपेक्षा आहेत.

  • 24 Nov 2024 08:25 AM (IST)

    24 Nov 2024 08:25 AM (IST)

    केएल राहुलची खेळी समाप्त

    भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा पहिल्या इनिंगमधील विकेट वादग्रस्त ठरला. आता त्याने पहिल्या इनिंगनंतर दमदार कमबॅक करत दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघासाठी ७५ धावांची खेळी खेळली आणि सध्या भारताचा संघ मजबूत स्थितीत उभा आहे.

  • 24 Nov 2024 08:19 AM (IST)

    24 Nov 2024 08:19 AM (IST)

    यशस्वी जयस्वालची शतकीय खेळी

    भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने भारतीय संघासाठी आणखी एक शतक नावावर केले आहे. यशस्वी जयस्वालने २०५ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी खेळून इतिहास रचला आहे.

    𝗠𝗮𝗶𝗱𝗲𝗻 𝗧𝗲𝘀𝘁 𝗰𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝘆 𝗶𝗻 𝗔𝘂𝘀𝘁𝗿𝗮𝗹𝗶𝗮 🔥

    A very special moment early on Sunday morning in the Perth Test as the immensely talented @ybj_19 brings up his maiden Test 100 on Australian soil.

    He registers his 4th Test ton 👏

    Live -… pic.twitter.com/S1kn2sWI0z

    — BCCI (@BCCI) November 24, 2024

  • 24 Nov 2024 08:16 AM (IST)

    24 Nov 2024 08:16 AM (IST)

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिनाला सुरुवात

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिल्या कसोटीचा तिसरा दिन सुरु झाला आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल भारतासाठी फलंदाजी करत आहे. टीम इंडियाने अजुनपर्यत एकही विकेट गमावला नाही.

Web Title: Ind vs aus 3rd day live update kl and jaiswals pair sweated out the australian bowler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 08:13 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • KL. Rahul

संबंधित बातम्या

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
1

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.