
KL Rahul and Yashasvi Jaiswal 130 runs Partnership
या भागीदारीदरम्यान राहुल आणि जैस्वाल यांनी मिळून एक ऐतिहासिक कामगिरी केली. जैस्वाल आणि केएल राहुल यांची सलामीची जोडी आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी सहावी जोडी ठरली आहे.
वेलिंग्टन कसोटीत केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी एकूण १३० धावा केल्या, आणि यासोबतच ३२ वर्षांत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी करणारी पहिली भारतीय सलामीची जोडी ठरली. यशस्वीने ८५ धावांचे, तर राहुलने ४२ धावांचे योगदान दिले. यासोबतच ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात १००० धावांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करणारी केवळ सहावी सलामीची जोडी आहे. तसेच या यादीत स्थान मिळवणारी ती दुसरी भारतीय सलामीची जोडी ठरली आहे. यापूर्वी, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने २८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १२६९ धावा केल्या होत्या.
यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू आणि नयन मोंगिया या सलामीच्या जोडीने १९९४ मध्ये न्यूझीलंडमध्ये १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. हा ३२ वर्षांचा दुष्काळ आता, राहुल आणि यशस्वीने संपवला आहे.
वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघ आता मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंडकडून, निकोल्स ३३५ चेंडूंमध्ये २१ चौकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला. तर,ग्लेन फिलिप्सने ११८ धावांचे योगदान दिले. या दोघांनी २१६ धावांची भागीदारी करून किवी संघाला ३६८ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. इतर कोणत्याही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही.
भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतले. राहुल आणि जैस्वाल यांनीही भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वालने ८९ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या आणि त्याचे शतक थोडक्यात हुकले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस, भारताची धावसंख्या १५८/१ अशी असून राहुल ५२ धावांवर देवदत्त पडिक्कल १६ धावांवर खेळपट्टीवर नाबाद होता.