This is boom boom Bumrah's Team They Trashed the Australia's Team
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ हा सामना 10 विकेटच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्याचे दिसून आला. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली. पण एका रिपोर्टनुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सराव सत्रात दिसला नाही. बुमराह वर्क लोड मॅनेजमेंटवर भर देत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मापाठोपाठ आता जसप्रीत बुमराहवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जसप्रीत बुमराह सरावापासून दूर
बुमराहबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, बुमराह सराव सत्रात सहभागी होत नाहीये. ॲडलेड कसोटीत त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, ट्रॅव्हिस हेडच्या शतकानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही बुमराहवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बुमराह वर्क लोड मॅनेजमेंटवर भर देत आहे. खेळाडूंनी सतत जास्त सामने खेळल्यास दुखापत होण्याची शक्यता वाढते.
ॲडलेडच्या पराभवानंतर टीम इंडियाने लगेच सरावाला केली सुरुवात
ॲडलेडचा पराभव भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला. या पराभवाची मीडियापासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. मात्र, कर्णधार रोहितसह अन्य खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीसाठी तयारी सुरू केली आहे. ॲडलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीही फलंदाजीसाठी नेटमध्ये पोहोचला. रोहितसोबतच शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनाही खूप घाम फुटला आहे.
ब्रिस्बेन कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल
टीम इंडिया ब्रिस्बेन कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. हा सामना भारताबरोबरच ऑस्ट्रेलियासाठीही खूप महत्त्वाचा असेल. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले होते. यशस्वी जैस्वालनेही दमदार शतकी खेळी खेळली.
पहिल्या कसोटीत केला चमत्कार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहने दोन दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
पहिल्या कसोटीत आठ विकेट
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. आपल्या दमदार कामगिरीमुळे बुमराहने ICC कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत दोन महान गोलंदाजांचा पराभव केला. बुमराह आता कसोटीतील नंबर 1 गोलंदाज बनला आहे.
बुमराह बनला जागतिक क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज
दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता. भारताचा बुमराह तिसऱ्या क्रमांकावर होता. आता बुमराहने या दोन वेगवान गोलंदाजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराहचे आता ताज्या आयसीसी क्रमवारीत ८८३ रेटिंग गुण आहेत. तर कागिसो रबाडाचे आता ८७२ रेटिंग गुण आहेत. रबाडाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याशिवाय जोश हेझलवूड 860 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.