फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा पहिला दिवस म्हणजेच एमसीजी टीम इंडियासाठी कडू-गोड होता असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. सुरुवातीला सॅम कॉन्स्टासने भारतीय गोलंदाजांचा नाश केला. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने धावा रोखल्या. त्याचवेळी तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने जास्त धावा केल्या असल्या तरी भारताच्याही विकेट्स भरपूर पडल्या. ऑस्ट्रेलियासाठी, पहिल्या दिवशी चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्यात सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ बळी घेतले.
या सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टास याला आजच्या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा सलामीला आले आणि मालिकेत पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. कॉन्स्टासने पहिल्याच सत्रात जलद गतीने ६० धावा करून संघाला आघाडी मिळवून दिली.
IND vs AUS : यशस्वी जयस्वालवर भडकला रोहित शर्मा! म्हणाला – गली क्रिकेट खेळत आहेस का?
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजाने दुसऱ्या सत्रात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ५७ धावा करून तो बाद झाला. भारताला तिसऱ्या सत्रात झटपट तीन विकेट मिळाल्या. यामध्ये जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. मात्र, सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांच्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतक ठोकले. मार्नस लॅबुशेन ७२ धावा करून वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट घेतली, तर बुमराहने मागील काही सामन्यांमध्ये शतक ठोकणारा ट्रॅव्हिस हेडला खाते उघडू दिले नाही. मिचेल मार्शला केवळ 4 धावा करता आल्या. दिवसाची शेवटची विकेट ॲलेक्स कॅरीच्या रूपात पडली, जो ३१ धावा करून आकाश दीपचा बळी ठरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ ६८ धावा करून नाबाद तर पॅट कमिन्स ८ धावा करून परतला. ८६ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३११/६ आहे.
That’ll be Tea on Day 1 of the 4th Test.
Australia 176/2
Scorecard – https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/KhtwBULaWq
— BCCI (@BCCI) December 26, 2024
सॅम कॉन्स्टासने आधी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि नंतर विराट कोहलीसोबत त्याची बाचाबाचीही पाहायला मिळाली. मात्र, या बाचाबाचीसाठी विराट कोहलीला शिक्षा होऊ शकते. विराट कोहलीच्या खांद्याला कॉन्स्टासचा धक्का लागला. आजच्या सामन्यांमध्ये चमत्कार झाला आणि सर्वानाच पाहून मोठा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार ठोकला होता. या पराक्रम करून तो बुमराहवर षटकार ठोकण्यात यशस्वी झालेला तो 3 वर्षातील पहिला फलंदाज आहे.