
'After that, Rohit and Virat..', Coach Gambhir opened up in the dressing room after the win against Australia; Watch Video
Gautam Gambhir On Rohit Sharma and Virat Kohli : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतीलसुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली होती. त्यानंतर 25 ऑक्टोबरला या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने पराभूत करून मालिकेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून माजी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करण्यात आले. बीसीसीआयने ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये गौतम गंभीर बोलत आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्यामुळे रोहित शर्माला सामनावीर तसेच मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे मालिकावीरचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विरोट कोहलीने देखील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 74 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 168 धावांची अभेद्य भागिदारी रचली. या भागिदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयकडून ड्रेसिंग रूममध्ये गंभीरला संबोधित करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यातील 69 धावांच्या सलामी भागीदारीचे देखील कौतुक करताना दिसत आहे. तसेच 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीरने ही भागीदारी महत्त्वाची असल्याचे देखील म्हटले आहे. त्यानंतर गंभीरने रोहित आणि कोहली यांच्यातील अभेद्य 168 भागीदारीचे देखील कौतुक केले आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, फलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मला शुभमन आणि रोहितची भागीदारी खूप महत्त्वाची वाटली. त्यानंतर रोहित आणि विराटची भागीदारी देखील सर्वोत्तम अशीच होती. रोहितची शतकी कामगिरी अद्भुत प्रकारात मोडणारी होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि कोहली यांनी सामन्याचा शेवट केला. यशस्वी पाठलाग करताना रोहित आणि कोहली दोघेही नाबाद राहिले याबद्दल गौतम गंभीरने आनंद देखील व्यक्त केला. यावेळी, रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज पदक देखील देण्यात आले.
An impressive all-round outing, applauded by inspiring words from Head Coach @GautamGambhir 🙌 🗣 🎥 A reflection of the 3️⃣rd #AUSvIND ODI, followed by a presentation of the 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀 medal 🏅 #TeamIndia | @ImRo45… — BCCI (@BCCI) October 27, 2025
हेही वाचा : सिडनीत विराट – रोहितचा शेवटचा सामना पाहून काॅमेंटेटर लागला ढसाढसा रडायला! Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेणाऱ्या हर्षित राणाचे देखील कोच गंभीरकडून कौतुक करण्यात आले. गंभीर म्हणाला की, मला वाटते की गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि 10 षटकांनंतर न गमावता 63 धावा केल्या. नंतर ऑस्ट्रेलियाला 237 धावांपर्यंत रोखणे ही मोठी कामगिरी होती. हर्षितचा विशेष उल्लेख करत कोच म्हणाला की, त्याचा स्पेल उत्कृष्ट होता. मी फक्त एवढेच म्हणेल की, की नम्र राहा, स्थिर राहा आणि कठोर परिश्रम करत राहा. असं कोच गौतम गंभीरने सांगितले.