Coach Morne Morkel gave a big update on Shubhman Gill
Shubhman Gill Injury Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला अजून सुरुवातही झालेली नाही, त्याआधीही भारतीय संघाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही, तर शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चरही चिंतेचा विषय आहे. अलीकडेच असे वृत्त आले की, गिलला फ्रॅक्चर झाले नाही आणि तो दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांच्या वक्तव्याने गील पर्थ कसोटीतही खेळताना दिसण्याची आशा निर्माण झाली आहे.
शुभमन गिल दिवसेंदिवस चांगला
मॉर्नी मॉर्केलने पत्रकार परिषदेत सांगितले की, शुभमन गिलच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे आणि तो पहिली कसोटी खेळण्याची शक्यता आहे. तो म्हणाला, गिल दिवसेंदिवस चांगला होत आहे, आम्ही 22 नोव्हेंबरच्या सकाळी त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेऊ. तो सराव सामन्यात चांगला खेळला, त्यामुळे आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही.”
शुभमन गिल याचे महत्त्व
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये भारतीय संघासाठी शुभमन गिल खूप महत्त्वाचा आहे. तो 2020-21 आणि त्यानंतर 2022-23 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीही खेळला आहे. गिलचे महत्त्व अधिक आहे कारण त्याने २०२०-२१ च्या मालिकेत ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळण्याचा अनुभव घेतला आहे. त्या मालिकेत गिलने तीन सामन्यांच्या 6 डावांमध्ये 259 धावा केल्या होत्या. त्याने गाबा येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत ९१ धावांची खेळी करीत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार
भारतीय संघासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याचवेळी मोहम्मद शमीची संघात अनुपस्थितीही भारतासमोर अडचणी निर्माण करीत आहे. शमीने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही तो बंगालकडून खेळताना दिसणार आहे. शमी या मालिकेच्या मध्यभागी भारतीय संघात सामील होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे, परंतु अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : ICC Ranking : हार्दिक पांड्या नंबर 1! टिळक वर्माने सूर्या-बाबरला टाकलं मागे