IND vs AUS: 'Rohit has changed my relationship...', Shubman Gill's confession on Sharma's relationship after taking over as ODI captain
India vs Australia ODI Series 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जाणार आहे. १९ ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरवात होणार आहे. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार शुभमन गिलने अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल चर्चा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत.
हेही वाचा : Archery World Cup 2025 : भारताच्या ज्योतीने रचला इतिहास! विश्वचषक अंतिम फेरीत मिळवला ऐतिहासिक विजय
एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी, शुभमन गिलने पत्रकार परिषदेमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने कबूल केले की विराट आणि रोहित हे त्याचे आदर्श खेळाडू आहेत.नवनियुक्त कर्णधार त्यांच्याबद्दल म्हणाला की, “मी लहान असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांना देखील आदर्श मानत असे. त्यांची खेळण्याची पद्धत आणि त्यांच्यात असलेली भूक यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. अशा दिग्गज खेळाडूंकडून नेतृत्व करणे आणि शिकणे हा माझ्या एक मोठा सन्मानच आहे.”
शुभमन गिल रोहित शर्मासोबतच्या नात्याबद्दल एकदम खुला होऊन बोलला. त्याने सांगितले की, कर्णधारपद बदलले असले तरी रोहितसोबतच्या त्याच्या नात्यात काही एक बदल झालेला नाही. शुभमन गिल म्हणाला की, “बाहेर जे काही चालले आहे, ते आमच्यात असे काहीही एक नाही. सर्व काही जुन्या काळासारखेच आहे. तो खूप मदतगार असून नेहमीच त्याचे अनुभव शेअर करत असतो. मी त्याच्याकडून सूचना मागत असतो.”
शुभमन गिल पुढे म्हणाला की, “माझे विराट आणि रोहित भाई दोघांशी देखील खूप चांगले संबंध असून मी नेहमीच त्यांचा सल्ला घेतो आणि जेव्हा माझे मत मांडण्याची वेळ येते तेव्हा ते अजिबात देखील मागेपुढे पाहत नाहीत.” भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, “या मालिकेत मला खात्री आहे की त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याच्या अनेक संधी असणार आहे. जर मला काही अडचण वाटली तर मी त्यांचा सल्ला घेण्यास जरा देखील संकोच करणार नाही.” असे देखील गिल म्हणाला.
हेही वाचा : IND vs AUS ODI: कपिल देव आणि मोहम्मद शमी यांची दहशत! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भरली होती धास्ती; वाचा सविस्तर
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि ध्रुव जुरेल.