ज्योती सुरेखा वेन्नम(फोटो-सोशल मिडिया)
Archery World Cup 2025 Jyoti creates history : भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने शनिवारी इतिहास रचला आहे. ज्योतीने विश्वचषक अंतिम फेरीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनली आहे. तिसऱ्या मानांकित ज्योतीने दमदार कामगिरी करत दुसऱ्या मानांकित एला गिब्सनला १५०-१४५ अशी धूळ चारली आहे. ज्योतीने सर्व १५ बाणांवर १०-१० असा दिमाखादार विजय मिळवला आहे.
हेही वाचा : Ranji Trophy 2025 : रिंकू सिंगने झळकावले शतक! उत्तर प्रदेशला संकटातून काढले बाहेर, वाचा सविस्तर
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती ठरलेली ज्योती सुरेखा वेन्नमची विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात क्वार्टरफायनलमध्ये अॅलेक्सिस रुईझवर १४३-१४० असा विजय मिळवून झाली होती, परंतु उपांत्य फेरीत तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोच्या आंद्रिया बेसेराविरुद्ध १४३-१४५ असा पराभव स्वीकारावा लागला होता.
कांस्यपदकाच्या सामन्यामध्ये, ज्योतीने उल्लेखनीय पुनरागमन करत सलग १५ वेळा १०-१० लक्ष्य गाठले आणि गिब्सनवर वर्चस्व गाजवले. सध्या महिलांच्या कंपाऊंड प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेली ज्योती तिच्या जागतिक क्रमवारीच्या आधारे नानजिंगमधील वैयक्तिक स्पर्धेसाठी देखील आता पात्र ठरली आहे.
विश्वचषक फायनलमध्ये ज्योतीचा हा तिसरा सहभाग ठरला. तिने यापूर्वी त्लाक्सकाला (२०२२) आणि हर्मोसिलो (२०२३) येथे भाग स्पर्धेत घेतला होता आहे. महिलांच्या कंपाऊंड प्रकारामधील आणखी एक भारतीय तिरंदाज मधुरा धामणगावकरला पहिल्या फेरीत मेक्सिकोच्या मारियाना बर्नालकडून १४२-१४५ असा पराभव पदरी पडला आणि तीला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
या वर्षी ऑबर्नडेल येथे कंपाऊंड मिश्र संघाचे विजेतेपद आपल्या नावावर करणारा ऋषभ यादव आता पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत भाग घेणार आहे. त्याचा सामना उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जोंगहोसोबत होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑबर्नडेल येथे कंपाऊंड मिश्र संघाचे विजेतेपद जिंकणारा ऋषभ यादव आणि ज्योती यांनी त्यांच्या क्रमवारीच्या आधारे नानजिंगमधील वैयक्तिक स्पर्धांसाठी पात्रता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.
हेही वाचा : IND vs AUS ODI: कपिल देव आणि मोहम्मद शमी यांची दहशत! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भरली होती धास्ती; वाचा सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यां दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे १९ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झाला आहे.