फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. टीम इंडियाची शानदार गोलंदाजी चौथ्या दिवशी पाहायला मिळाली, पण तरीही ऑस्ट्रेलियाने ३०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे १०० हून अधिक धावांची आघाडी शिल्लक होती. आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढताना दिसत आहे. आता आम्ही तुम्हाला मेलबर्नमध्ये कसोटी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टार्गेटबद्दल सांगणार आहोत, ज्याचा पाठलाग इंग्लंडने केला होता.
१९२८ साली मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडसमोर ३२२ धावांचे लक्ष्य होते. जे इंग्लंडने मिळवले होते आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. कसोटी क्रिकेटमधील या मैदानावर हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लक्ष्य होते.
1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (३२२ लक्ष्य) – इंग्लंड – विजेता
2. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२९७ लक्ष्य) – इंग्लंड – विजेता
3. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२९५ लक्ष्य) – दक्षिण आफ्रिका – विजेता
4. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२८६ लक्ष्य) – ऑस्ट्रेलिया – विजेता
5. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२८२ लक्ष्य) – इंग्लंड – विजेता
मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे आता ३०० हून अधिक धावांची आघाडी आहे. जसजशी आघाडी वाढत आहे तसतसे टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढू लागले आहे. मेलबर्नमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. २०२० मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर ७० धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने २ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथ्या सामन्याचा आज चौथा दिवस पार पडला. यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी त्यांची जादू दाखवली. भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने चार विकेट्स नावावर केले तर सिराजने तीन विकेट्स संघासाठी घेतले आहेत. एक विकेट रवींद्र जडेजाने घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मार्नस लॅबुशेनने संघासाठी महत्वाची खेळी खेळली. त्याने संघासाठी ७० धावा केल्या तर पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन या दोघांनी ४१ धावांची खेळी खेळली. नॅथन लियॉन सामन्यात नाबाद राहिला.
That’s Stumps on Day 4
Australia reach 228/9 and lead by 333 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/Gw8NbCljL7
— BCCI (@BCCI) December 29, 2024