फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया
भारताच्या संघाची सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरु आहे. या मालिकेचा चौथा सामना सुरु आहे, या सामन्याचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांच्या नावावर राहिला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने संघासाठी कमालीची कामगिरी करून दाखवली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने दमदार शतक झळकावून भारताच्या स्थितीला काहीसे बळ दिले. नितीश कुमार रेड्डी टीम इंडियासाठी ११४ धावांची खेळी खेळली.
कालच्या या त्याने खेळलेल्या खेळीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि नितीश रेड्डी यांची खेळी पाहून त्यांचे आई-वडील आणि बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रेड्डी कुटूंबाची मुलाखत देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर नितीश रेड्डी यांच्या कुटुंबीयांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची स्टेडियममध्ये भेट घेतली. नितीशच्या आई-वडिलांनी समालोचक झालेल्या या महान क्रिकेटरच्या चरणांना स्पर्श केला.
वास्तविक, नितीश रेड्डी यांच्या शतकानंतर त्यांचे आई-वडील आणि बहीण प्रसिद्धीच्या झोतात आले. नंतर तो काही क्रिकेटपटूंनाही भेटला. दरम्यान, ते सुनील गावस्कर यांना भेटले तेव्हा नितीश रेड्डी यांच्या आई आणि वडिलांनी त्यांचे पाय स्पर्श केले. गावसकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी नंतर त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील जनक म्हणून ओळखले जातात. तो बराच काळ भारतासाठी क्रिकेट खेळला आणि आता क्रिकेट सोडल्यानंतर कॉमेंट्री करत आहे, तो क्रिकेटला फॉलो करतो.
A father’s pride, a son’s resolve! 💙#NitishKumarReddy‘s father, #MutyalaReddy shares an emotional journey, as #RaviShastri & #SunilGavaskar hail the grit, character & sacrifices behind the glory! 🫡💪🏻#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 4, LIVE NOW! pic.twitter.com/fLK7rWvSOd
— Star Sports (@StarSportsIndia) December 29, 2024
नितीश रेड्डी यांनी शनिवारी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले होते. शेवटची विकेट पडण्यापूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. मोहम्मद सिराज काही चेंडू खेळण्यात यशस्वी ठरला आणि त्याच दरम्यान नितीश रेड्डीने आपले शतक पूर्ण केले. तो १८९ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११४ धावा करून बाद झाला. भारताकडून ८व्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियात सर्वाधिक खेळी खेळणारा तो फलंदाज ठरला आहे. या डावात त्याचा स्ट्राईक रेट ६०.३२ होता. या खेळीमुळे भारताने फॉलोऑन टाळला आणि सामन्यात पुनरागमन केले, कारण वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सहा विकेट पडल्या होत्या.