
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आज T२० मालिकेचा शेवटचा तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मालिकेचे डोम सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे, बोलायचं झालं तर टीम इंडियाने मालिका नावावर केली आहे. आज दोन्ही संघामधील शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे भारतीय संघामध्ये काही बदल होण्याच्या शक्यता आहे. दोन सामन्यांमध्ये हर्षित राणा, रवी बिष्णोई आणि शिवम दुबे यांना अजुनपर्यत मालिकेमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये तिसरा T20 सामना हा राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम रंगणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असू शकते यावर एकदा नजर टाका.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T२० सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला. यानंतर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T२० मध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग सातवी T२० मालिका जिंकली. आता सूर्या आर्मीला तिसऱ्या T२० मध्येही विजयाची नोंद करायची आहे.