IND Vs END: Good news for Team India before the England series! The strength of the team will increase, 'this' key player will join the team..
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक खुशखबर समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघात सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता म्हणून मायदेशी परतला होता. तथापि, आता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली आहे. अशा परिस्थितीत गंभीर लवकरच संघात सामील होण्याची शक्यता आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत दिसून आले. गंभीरच्या अनुपस्थितीत ते भारतीय संघाच्या तयारीवर लक्ष्य देत होते. तथापि, त्यांची कोणतीही अधिकृत भूमिका नसून ते लवकरच भारतात पतणार आहे. त्याच वेळी, अहवालात असे म्हटले आहे की गंभीर १६ जून किंवा १७ जूनपर्यंत संघासोबत जुळणार आहे. तारीख अद्याप निश्चित नसली तरी असे म्हटले जात आहे की तो पहिल्या कसोटीपूर्वी संघात सामील होणार आहे.
हेही वाचा: IND Vs ENG : Shardul Thakur ने फोडली डरकाळी! इंग्लंडच्या गोटात चिंता; कसोटी मालिकेपूर्वी ठोकले शतक..
गंभीरच्या जवळच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे की, त्याने त्याच्या आईच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. गंभीरच्या आईची प्रकृती सुधारत आहे पण ती अजून देखील आयसीयूमध्ये आहे. तरीही, गंभीर लवकरच संघात सामील होणार आहे. अशा परिस्थितीत, तो पहिल्या कसोटीपूर्वी संघात सामील होण्याची दाट शक्यता आहे.
लक्ष्मण एका परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला होता. नंतर, तो संघाला भेटण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. हा त्याच्या योजनेचा एक भाग होता. तो लंडनहून लॉसनेला एका आंतर-संघ सामन्याचे निरीक्षण करण्यासाठी पोहचला होता, जो कसोटी मालिकेपूर्वीचा शेवटचा एक तयारी सामना होता. त्याची भूमिका फक्त काही संभाषण आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यापुरती मर्यादित असल्याची माहिती मिळत आहे. तसेच तो तो एक-दोन दिवसांत परत येणार आहे.
हेही वाचा : TNPL मध्ये एकाच चेंडूवर तीनदा ओव्हरथ्रो, कर्णधार आर अश्विन पाहत राहिला; Video Viral
लक्ष्मणने या काळात संघाला आपला अनुभव सांगितला. त्याने इंग्लंडमध्ये ११ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने ३४.४७ च्या सरासरीने ५८६ धावा काढल्या आहेत. याशिवाय, त्याने इंग्लंडमध्ये आणि भारत ‘अ’ सामन्यांमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये २३ इतर प्रथम श्रेणी सामने देखील खेळलेले आहेत. अशा परिस्थितीत लक्ष्मणचा सल्ला संघासाठी खूप उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.