शार्दूल ठाकूर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तथापि, ही मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आपली शानदार कामगिरी दाखवून दिली आहे. त्याच्या कामगिरीने एकप्रकारे त्याने ब्रिटिशांना इशाराच दिला आहे.
अधिक माहिती अशी की, शार्दुल ठाकूरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. रविवारी, १५ जून रोजी, त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी जोरदार दावा ठोकला आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सध्या सुरू असलेल्या आंतर-संघ सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी केली आहे.
शार्दुल ठाकूरबाबत बोलायचे झाल्यास रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलेल्या संघासाठी ठकुरने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने नऊ सामन्यांमध्ये ३५ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. त्याने २०२३ मध्ये केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत सामन्यात भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.
२०२४-२५ च्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना शार्दुलने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचे फळ म्हणून त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. तथापि, या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ संघासाठी झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी केली आहे. याशिवाय, त्याने संघाच्या अंतर्गत सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या गोलंदाजीने संघाला प्रभावित केले.
शार्दुल ठाकूरने १२ ऑक्टोबर २०१८ रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ३१ फलंदाजांना पव्हेलियनमध्ये पाठवले आहे. पाच दिवसांच्या स्वरूपात त्याने एकदा पाच बळी देखील टिपले आहेत.
🚨 THE SHARDUL THAKUR SHOW 🚨
– Shardul Thakur scored a brilliant Hundred in Intra Squad Game, He smashed 122 runs. (Devendra Pandey). pic.twitter.com/ym1Z6peD7n
— Tanuj (@ImTanujSingh) June 15, 2025
शार्दुल ठाकूरने आतापर्यंत खेळलेल्या १८ डावांमध्ये चार अर्धशतकांसह एकूण ३३१ धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडमध्ये भारतासाठी चार कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १७३ धावा आणि १० बळी घेतले आहेत. त्याने इंग्लंडच्या भूमीवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जिथे त्याने पहिल्या डावात ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. महत्त्वाचे अर्धशतक झळकावले.
हेही वाचा : TNPL मध्ये एकाच चेंडूवर तीनदा ओव्हरथ्रो, कर्णधार आर अश्विन पाहत राहिला; Video Viral
संघाच्या अंतर्गत सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारताकडून संघचा नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी अर्धशतके लागावली आणि दुसऱ्या दिवशी सरफराज खानने ७६ चेंडूचा सामना करत शतक झळकावले. तर राहुल कसोटी मालिकेत भारताकडून सलामीला फलंदाजीला येणार आहे. २०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या पहिल्या परदेशी मालिकेत गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची अपेक्षा आहे.परंतु, सरफराज खान हा १८ सदस्यीय कसोटी संघाचा भाग नाही.