IND Vs END: 'This' feat was done against England 9 years ago! 'That' player is back in Team India; British are shocked
IND Vs END : बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय वरिष्ठ संघापूर्वी, तरुण खेळाडू इंग्लंड लायन्ससोबत तेथे दोन अनधिकृत कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर ते भारतीय संघासोबत इंट्रा-स्क्वॉड सामना खेळतील. एक मोठी बातमी म्हणजे करुण नायर तब्बल ८ वर्षांनी भारताच्या रेड बॉल संघात परतला आहे.
करुण नायरने २०१६ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर, त्याने चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ३०३ धावांची नाबाद खेळी खेळून करून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावण्याचा भीम पराक्रम केला होता. त्यानंतर तो आपला फॉर्म टिकवू शकला नाही. त्यानंतर २०१७ मध्ये त्याला टीम इंडियामधून डच्चू देण्यात आला होता.
भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर करुण नायरने हार न मानता तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. तथापि, या काळात त्याची कामगिरी सरासरी राहिली असली तरी, या हंगामात मात्र करुण नायरने त्याची बट चांगलीच तळपली आहे. ज्यामुळे त्याची दखल घेणे भाग पडले आहे.
या हंगामात विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना करुणने ८ सामन्यांमध्ये ७७९ धावांचा पाऊस पडला आहे. या काळात त्याची सरासरी ३८९ होती. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात त्याने १६ डावांमध्ये ८६३ धावा कटल्या होत्या आणि विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकण्यास मोठी मदत केली होती. याशिवाय, त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत १७७ च्या स्ट्राईक रेटने २५५ धावा केल्या आहेत.
करुण नायरची कसोटी कारकीर्द
आता करुण नायरची इंडिया अ संघात वापसी झाली आहे. जर नायरने यामध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. नायर आतापर्यंत भारतासाठी सहा कसोटी सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ६२.३३ च्या प्रभावी सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली तर जवळजवळ आठ वर्षांनी कसोटी संघात त्याचे पुनरागमन होणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नई कसोटीत इंग्लंडविरुद्ध करुण नायरने ३०३ धावांची ऐतिहासिक खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार ठरेना! Ravi Shastri कडून ‘या’ खेळाडूच्या नावाला पसंती…
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित अहमद, हर्षित कुमार, खलराज, अनंत राणा, रौन कुमार. गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे