फोटो सौजन्य – X (Sony Sports Network)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये चांगले कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पहिल्या डावामध्ये भारताच्या फलंदाजाने देखील कौतुकास्पद कामगिरी केली. रोहित शर्माची निवृत्तीनंतर शुभमन गिलने हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात दोन सामने झाले यामध्ये पहिल्या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता सुरू असलेल्या सामना भारताच्या संघाला जिंकणे अनिवार्य आहे.
याचे कारण म्हणजेच मागील इतिहासामध्ये भारताचा संघाने आतापर्यंत एकही मालिका इंग्लंड विरुद्ध जिंकलेली नाही. आता सोशल मीडियावर सोनी लिव नेटवर्कच्या अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये उपकर्णधार रिषभ पंत याची हळवी बाजु पाहायला मिळाली. भारताचा कर्णधार गिल याच्या डोक्याला मार लागल्यानंतर पंत त्याच्या मदतीसाठी धावून आला.
IPL 2026 च्या आधीच संजू सॅमसन मालामाल, बनला सर्वात महागडा खेळाडू! या संघाने पाण्यासारखा ओतला पैसा
भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल त्रिशतकी खेळी करू शकला नाही. भारतीय कर्णधाराने २६९ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी आलेला शुभमन गिल मोठ्या दुखापतीतून थोडक्यात बचावला. त्याच्या डोक्याला चेंडू लागला. यादरम्यान तो वेदनेने कण्हताना दिसला.
रवींद्र जडेजाच्या षटकात हॅरी ब्रूकने वेगवान गोलंदाजी केली. यादरम्यान पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या गिलला चेंडू लागला. तोपर्यंत त्याला काहीही समजले नाही तोपर्यंत चेंडू त्याच्या कपाळावर लागला होता. त्यानंतर फिजिओला मैदानात यावे लागले. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील कर्णधार गिलच्या प्रकृतीची विचारपूस करताना दिसला. चांगली गोष्ट म्हणजे गिलला जास्त दुखापत झाली नाही, म्हणून त्याने पुन्हा क्षेत्ररक्षण सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Brothers🫂#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/OdClX7Cn49
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2025
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली. कर्णधार झाल्यानंतर गिलची फलंदाजी आणखी सुधारली आहे. त्याने लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत शतक आणि एजबॅस्टनमध्ये द्विशतक झळकावले. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात गिलने २२७ चेंडूत १४७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि १ षटकार मारला. दुसऱ्या डावात गिलला फक्त ८ धावा करता आल्या. एजबॅस्टनमध्ये गिलने फलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने ३८७ चेंडूंचा सामना केला आणि ६९.५१ च्या स्ट्राईक रेटने २६९ धावा केल्या. पहिल्या डावात गिलने ३० चौकार आणि ३ षटकार मारले.