फोटो सौजन्य – X
भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन होणार आहे, तर इंग्लडच्या संघामध्ये जोफ्रा आर्चर ४ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2025 चा जोफ्रा आर्चर भाग होता पण तो काही प्रभावशाली कामगिरी या १८ व्या सिझनमध्ये करु शकला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज म्हणजेच १० जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू होणार आहे. हा सामना १० जुलै ते १४ जुलै २०२५ दरम्यान खेळला जाईल.
सध्या, पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, जिथे दोन्ही संघ आता आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव केला.आता त्यांचे लक्ष लॉर्ड्सवर इंग्लंडला हरवून मालिकेत आघाडी घेण्यावर असेल. त्याच वेळी, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ दमदार पुनरागमनावर लक्ष केंद्रित करेल. अशा परिस्थितीत, तिसऱ्या कसोटी सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
IND vs ENG Pitch Report : तिसऱ्या कसोटीत कोणाचा बोलबाला? कोणाला मदत होणार खेळपट्टीची…
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना काही तासात सुरू होणार आहे. हा सामना 10 जुलै ते 14 जुलै या दरम्यान खेळवल्या जाणार आहे या सामन्याचा आयोजन लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन येथे करण्यात आले आहे.या मालिकेमध्ये पहिला सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला होता तर दुसरा सामना हा भारतीय संघाने जिंकला होता. मालिकेमध्ये 1–1 अशी बरोबरी आहे, लंडनमधील स्थानिक वेळ ११ वाजता हा सामना सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ३.३० मिनिटांनी सुरू होणार आहे, या सामन्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच तीन वाजता नाणेफेक होईल.
🎯 Nose and toes!
Expect some nasty bouncers and menacing yorkers as #JofraArcher and Jasprit Bumrah lock horns at Lord’s!
READ ➡️ https://t.co/Lh5fsWZF73 | @ShayanAcharya #ENGvIND #LordsTest 🏴 🤝 🇮🇳 pic.twitter.com/g99GyfNHpm
— Sportstar (@sportstarweb) July 10, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आत्तापर्यंत 138 सामने खेळवण्यात आले आहेत. यामधील इंग्लंडच्या संघाने 52 सामने जिंकले आहेत तर भारताच्या संघाने 36 सामने जिंकले आहेत आणि यामध्ये 50 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 19 वेळा आमना सामना झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने तीन सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 12 सामने जिंकले आहेत चार सामने हे ड्रॉ झाले आहेत. मागील पाच कसोटी सामन बद्दल बोलायचं झाले तर भारताने इंग्लंड विरुद्ध चार कसोटी जिंकल्या आहेत.
जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी परतत आहेत. आता केवळ फलंदाजी आणि चेंडूच नाही तर संयम, रणनीती आणि मानसिक शक्तीचीही परीक्षा घेतली जाईल. तिसऱ्या कसोटीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे आणि त्याच्या प्लेइंग-११ मध्ये पुनरागमनामुळे प्रसिद्ध कृष्णाला वगळले जाऊ शकते. दुसरीकडे, जोफ्रा आर्चर २०२१ नंतर कसोटी सामने खेळेल. त्याच्या पुनरागमनामुळे इंग्लंडला एक नवीन बळ मिळेल.