फोटो सौजन्य – X (Lord's Cricket Ground)
भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये 10 जुलैपासुन तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेचे दोन सामने झाले आहेत, आजपासुन तिसऱ्या कसोटीचा शुभारंभ होणार आहे. 10 जुलैपासून ‘क्रिकेटचा मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील. एजबॅस्टन येथे झालेला दुसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे, इंग्लंडने लीड्स येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकला होता.
इंग्लंडमधील इतर मैदानांप्रमाणे, येथे भारताचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही, परंतु गेल्या तीन दौऱ्यांपैकी भारताने येथे 2 वेळा तिरंगा फडकवण्यात यश मिळवले आहे. त्याच वेळी, मालिकेतील शेवटचा सामना जिंकल्यानंतर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा ब्रिगेडचे मनोबल उंचावेल. चला भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टी अहवालावरही एक नजर टाकूया.
IND vs ENG : लाॅर्ड्स कसोटी आधी शार्दुल ठाकुरने जसप्रीत बुमराहचे धरले पाय! लॉर्ड्स कसोटीपूर्वी अस घडलं काय? Video Viral
लॉर्ड्सवरून येणाऱ्या खेळपट्टीचे फोटो पाहून वेगवान गोलंदाजांना खूप आनंद होईल. खरं तर, एजबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर लॉर्ड्सची खेळपट्टी खूप खास असेल अशी अपेक्षा होती. लॉर्ड्समध्ये एक पॅटर्न आहे, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही दिसून आले. तथापि, खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली बनते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय असेल.
ᴍᴀᴛᴄʜ ᴅᴀʏ 😎
🏟️ Lord’s Cricket Ground
💻 https://t.co/Z3MPyeKtDz
📱 Official BCCI App
⏰ 3:30 PM IST#TEAMINDIA | #ENGvIND pic.twitter.com/CTO90GzuTO— BCCI (@BCCI) July 10, 2025
लॉर्ड्स मैदानावर आतापर्यत 148 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पहिले फलंदाजी करणारा संघ हा 53 सामने जिंकला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संघ हा 44 सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. नाणेफेक जिंकलेल्या संघाने पहिले फलंदाजी करुन 54 सामने जिंकले आहेत, तर नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करणारा 43 सामने जिंकले आहेत. 51 सामने या मैदानावर आतापर्यत ड्राॅ झाले आहेत.
लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. येथे खेळल्या गेलेल्या १९ सामन्यांपैकी टीम इंडियाला १२ वेळा पराभव पत्करावा लागला आहे, तर भारताने येथे फक्त तीन सामने जिंकले आहेत. तथापि, या तीन विजयांपैकी दोन विजय अलिकडच्या काळात मिळाले आहेत. भारताने २०१४ आणि २०२१ मध्ये लॉर्ड्सवर तिरंगा फडकवला होता. भारताला येथे पहिला विजय १९८६ मध्ये मिळाला होता.