IND vs ENG 4th Test: Captain Ben Stokes' big feat: He achieved 'this' record-breaking feat in a single series..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी क्षनद्रा कामगिरीत करत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. या सामन्यात पहिल्या डावात ३५८ धाव केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ६६९ धावा करून ३११ धावांची आघाडी घेतली होती. भारताने आपल्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स गमावून ४४५ धावा केल्या. परिणामी हा सामना भारताने ड्रॉ करण्यात यश मिळवले. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या मालिकेत आतापर्यंत चार सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करून इतिहास रचला आहे. मँचेस्टरमध्ये स्टोक्सने प्रथम गोलंदाजीने पाच विकेट्स मिळवल्या, त्यानंतर त्याने शानदार फलंदाजीने १४१ धावांची खेळी साकारली.
यास कामगिरीने कर्णधार बेन स्टोक्सने या मालिकेत आपल्या ३०० धावा देखील पूर्ण केल्या. या सोबतच बेन स्टोक्स एका कसोटी मालिकेत ३०० पेक्षा जास्त धावा करणारा आणि १५ पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला इंग्लंडचा कर्णधार आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये हा पराक्रम इंग्लंडचा एकमेव खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफने एका कसोटी मालिकेत करून दाखवला होता. त्याने २००५ च्या अॅशेसमध्ये ही किमया साधली होती. चौथ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात शतक आणि पाच विकेट्स घेऊन, स्टोक्स एकाच कसोटीत शतक आणि पाच विकेट्स घेणारा पहिला इंग्लिश आणि जगातील पाचवा कर्णधार ठरला आहे.
या शानदार कामगिरीने बेन स्टोक्सने सामनावीर पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. स्टोक्सचा हा १२ वा सामनावीर पुरस्कार ठरला. सामनावीराच्या बाबतीत स्टोक्सने इयान बोथमची बरोबरी केली आहे. त्याच्यापेक्षा जास्त सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर जमा आहे. जो रूटने १५७ कसोटी सामन्यांमध्ये १३ सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या १०३ धावा, तसेच रवींद्र जडेजाच्या नाबाद १०७* आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद १०१ धावा मह्त्वाच्या ठरल्या. तसेच भारताचा भरवशाचा फलंदाज केएल राहुलच्या ९० धावांच्या जोरावर ओल्ड ट्रॅफर्ड येथे चौथा कसोटी सामना ड्रॉ राखण्यात सिह मिळवले. पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडीवर असणाऱ्या भारताने आपले दोन्ही सलामीवीर शून्यावर गमावल्यानंतर भारत पराभवाच्या उंबरठ्यावर दिसत होता.
अशा परिस्थितीत केएल राहुल आणि गिल यांनी चौथा दिवस खेळून काढला. पाचवव्या दिवशी राहुल ९० वर बाद झाला तर गिलहि आपले शतक पूर्णकरून माघारी परतला. तथापि, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारतासाठी १८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. या दोघांनी ३३५ चेंडूत २०३ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताचा पराभव टाळला. या भागीदारीमध्ये जडेजाने नाबाद १०७ आणि सुंदरने नाबाद १०१ धावा केल्या.