IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. भारताने हा सामना ड्रॉ केला. या सामन्यात पहिल्या डावात ३५८ धाव केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभा केला आणि ३११ धावांची आघाडी मिळवली होती. प्रतिऊत्तरात भारताने दमदार खेळ खेळून ४ विकेट्स गमावून ४४५ धावा केल्या. परिणामी हा सामना भारताने ड्रॉ करण्यात यश मिळवले. या मालिकेत आतापर्यंत भारतीय फलंदाजांची कामगिरी शानदार राहिली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक भीम पराक्रम केला आहे. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी एकूण 11 शतकं झळकावत 46 वर्षांपूर्वीचा जुन्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या विक्रमाबाबत आपण जाणून घेऊया.
PHOTOS: Team India's new feat under the leadership of Yuva Gill! Equals 'that' record from 46 years ago..
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेल्या जात असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. पण आतापर्यंत झालेल्या चारही कसोटी सामन्यात भारतने चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एका खास विक्रमासोबत बरोबरी साधली आहे. 46 वर्षानंतर भारतीय फलंदाजांनी एकाच मालिकेत ११ शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे.(Photo- BCCI)
इंग्लंडविरुद्ध लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (१०१), शुबमन गिल (१४७) आणि ऋषभ पंत (१३४) या तिघांनी शतके झळकावली. दुसऱ्या डावात केएल राहुल (१३७) आणि ऋषभ पंत (११८) यांनी शतके ठोकली होती.(Photo- BCCI)
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने द्विशतक झळकावले होते. त्याने २६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात गिलने १६१ धावांची खेळी करून इतिहास रचला होता.
त्याचप्रमाणे, लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवण्यात आल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा भरवशाचा फलंदाज केएल राहुलने १०० धावांची शानदार खेळी केली होती. (Photo- BCCI)
मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताने सामना ड्रॉ केला. यामागे शुभमन गिल (१०३), रवींद्र जडेजा( १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर(१०१) यांनी झळकावलेल्या शतकांची जादू होती. या सामन्यात तीन भारतीय फलंदाजानी शतके लगावली होती. (Photo- BCCI)
वेस्ट इंडिजविरुद्ध १९७८-७९ मध्ये झालेल्या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकूण 11 शतके ठोकली होती. तो एक विक्रम होता. आता इंग्लंडविरद्धच्या चार सामन्यांत भारताच्या युवा फलंदाजांनी एकूण 11 शतकांची झडी लावली आणि ४२ वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी साधली. तसेच आता केनिंग्टन ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून शतकांची अशा बळावली आहे. जर शतक जाहलकावली तर नव्या इतिहासाची नोंद होईल. (Photo- BCCI)