Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

भारताच्या 253 धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमछाक झाली. सुरूवातील तुफान खेळीने सुरूवात करणाऱ्या इंग्लंडची स्वप्नं अक्सर पटेलच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे धुळीला मिळाली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 05, 2026 | 10:51 PM
भारताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश (फोटो सौजन्य - Instagram)

भारताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताने गाठली फायनल
  • अक्षर पटेलच्या फिल्डिंगची कमाल
  • इंग्लंडचे स्वप्नं धुळीला 
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यात भारताकडून मिळालेल्या २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरूवात केली होती. मात्र भारताच्या गोलंदाजांना समाचार घेतानाही चांगल्या फिल्डिंगमुळे भारताने आपले लक्ष्य गाठले. या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो म्हणजे अक्षर पटेल. 

अक्षर पटेलने टॉम बँटनला बाद केले. त्याआधी वरुण, हार्दिक आणि बुमराह यांनी त्यांचे बळी घेतले होते. गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले होते. मात्र वेळोवेळी विकेट्स घेत इंग्लंडचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भारतीय टीमने रोखले आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ८ मार्च रोजी अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरूद्ध भारत अंतिम सामना खेळणार आहे. 

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

संजू आणि शिवमची स्फोटक खेळी 

संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक खेळी आणि अखेर हार्दिक पंड्याच्या अंतिम टचमुळे भारताने चालू टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ७ गडी गमावून २५३ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी २५४ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी जोरदार सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९७ धावांची भागीदारी केली. 

संजू ४२ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला, ज्यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्यांच्याशिवाय, शिवम दुबेने २५ चेंडूत ४३, हार्दिकने १२ चेंडूत २७ आणि तिलकने २७ चेंडूत २१ धावा केल्या. टी२० विश्वचषक बाद फेरीत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे आणि टी२० विश्वचषकातील चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने कोणतेही बदल केले नसले तरी, इंग्लंडने एक बदल केला. 

IND vs ENG Semi Final: भारताच्या टीमकडे इतिहास रचण्याची संधी, श्रीलंकेनंतर ठरू शकते दुसरी टीम

इंग्लंडच्या बॅटर्सने दिली लढाई 

भारताने अत्यंत मोठा धावांचा डोंगर उभा केलेला असतानाही इंग्लंडने चांगलीच लढाई दिली. बेथलने सर्वोत्तम धावा केल्या आणि शेवटपर्यंत मॅच वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इतर बॉलर्सची धुलाई होताना बुमराहने मात्र अत्यंत उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि कमी धावा देण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत हा सामना चांगलाच रंगला आणि ज्यामुळे या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्वच चाहत्यांना मजा आली. 

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

भारताचे प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

Web Title: T20 world cup 2026 india vs england final score india into final beats eng by 7 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:51 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IND Vs ENG
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
1

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

IND vs ENG Semi Final: भारताच्या टीमकडे इतिहास रचण्याची संधी, श्रीलंकेनंतर ठरू शकते दुसरी टीम
2

IND vs ENG Semi Final: भारताच्या टीमकडे इतिहास रचण्याची संधी, श्रीलंकेनंतर ठरू शकते दुसरी टीम

IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान
3

IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान

Sanju Samson चा सोपा कॅच सोडून केली हॅरी ब्रूकने चूक, 6 मारत उडवले इंग्लंडची झोप; थोडक्यासाठी शतक हुकले
4

Sanju Samson चा सोपा कॅच सोडून केली हॅरी ब्रूकने चूक, 6 मारत उडवले इंग्लंडची झोप; थोडक्यासाठी शतक हुकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.