Ind vs Eng: Indian team sets foot on England soil for Tendulkar-Anderson Trophy; BCCI shares video..
Ind vs Eng : इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ ब्रिटीश भूमीवर पोहोचला आहे. २० जूनल पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात होणार आहे. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चक्र देखील भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेने सुरू होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून ब्रिटनला रवाना झाला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटकोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त झाले आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर काही दिवसांनी विराट कोहलीने देखील या फॉरमॅटला राम राम केला आहे. आता भारतीय संघ एका नवीन प्रवसाला सुरवात करता आहेत. इंग्लंडला पोहोचताच बीसीसीआयकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना बीसीसीआयने लिहिले की इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ ब्रिटनला पोहोचला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू दिसून येत आहेत.
हेही वाचा : “भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!
बीसीसीआयने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळालेल्या साई सुदर्शनने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा भाग होऊन चांगले वाटत आहे, विशेषतः कसोटी मालिकेसाठी. ब्रिटनमध्ये आपले स्वागत आहे. तथापि, या मालिकेसाठी अनेक खेळाडू या आधीच ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत. जिथे इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन अनधिकृत कसोटी सामने खेळवण्यात येत आहेत. त्यानंतर, भारतीय संघ आपापसात संघात सामने खेळणार आहे.
Touchdown UK 🛬#TeamIndia have arrived for the five-match Test series against England 🙌#ENGvIND pic.twitter.com/QK5MMk9Liw
— BCCI (@BCCI) June 7, 2025
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लड दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये कोण घेणार रोहित शर्माची जागा? समोर आली तीन नावं
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बाथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.