IND vs ENG: Joe Root's record-breaking century in Manchester! Broke Ponting's record; became the second player to score the most runs in Tests..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामाना खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने इतिहास रचला आहे. त्याने मँचेस्टर येथे विक्रमी जो रूटने १२० धावा केल्या आहेत. यासह, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रूटने रिकी पॉन्टिंगला पिछाडीवर टाकले आहे. आता जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रूटने रिकी पॉन्टिंगचा १३,३७८ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. रूटने १०१ व्या षटकात ही कामगिरी करून दाखवली आहे.
तत्पूर्वी, डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या जो रूटने मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत द्रविड आणि कॅलिस यांचा विक्रम मोडला आहे. त्याने ३१ धावा करताच या दोन दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आणि तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर त्याने १२० धावा करताच रिकी पॉटिंगचा विक्रम खालसा केला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : मँचेस्टरमध्ये विकेट पाडण्याचे वांदे! रवींद्र जडेजाचा अंशुल कंबोजवर राग अनावर..; पहा Video
भारताच्या दिग्गज फलंदाज राहुल द्रविडने १९९६ ते २०१२ पर्यंत एकूण १६४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये राहुलने एकूण १३,२८८ धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६ सामन्यांमध्ये १३,२८९ धावा केल्या होत्या. आता जो रूटने दोन दिग्गजांना पिछाडीवर टाकले आहे. यापुढे त्याचे लक्ष पॉन्टिंग आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर होते. याच दरम्यान त्याला पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी १२० धावांची गरज होती. त्याने १२० धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पॉन्टिंगचा विक्रम मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
Presenting the second highest run-getter in Test cricket history 🥁#WTC27 | #ENGvIND ➡️ https://t.co/ZxLl2vea3J pic.twitter.com/Z2WWzaYdm4
— ICC (@ICC) July 25, 2025
जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबतीत जगातील दुसरा खेळाडू बनला आहे. सचिन तेंडुलकर या विक्रमात अव्वलस्थानी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना रूटचा १५७ वा कसोटी सामना असून या काळात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३७ शतके आणि ६६ अर्धशतके झळकावली आहेत. आता त्याच्या खात्यावर कसोटी क्रिकेटमध्ये १३,२९० धावा जमा आहेत.
भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम जमा आहे. तेंडुलकरने १९८९ ते २०१३ दरम्यान भारतासाठी २०० कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने १५,९२१ धावा फटकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडणाऱ्या जो रूटचा आता सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर डोळा असणार आहे.