रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. भारताने दिलेल्या लक्ष्याच्या प्रतिउत्तरात इंग्लंड संघ दमदार कामगिरी करत तिसऱ्या दिवशी फ्रंफूटवर आला आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी ४ विकेट्स गमावून ४२१ धावा करून ६३ धावांची आघाडी घेतली आहे. या दरम्यान इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले आहे. मैदानावर या जो रूट ११५ तर बेन स्टोक्स ३२ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी अंशुल कंबोजकडून मोठी चूक झाली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. त्याच्या या चुकीमुळे शतकवीर जो रूटची विकेट गमवावी लागली आहे. त्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजाने कंबोजवर चालू सामन्यातच संताप व्यक्त केला आहे.
मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असताना जो रूटची विकेट पडण्याची शक्यता वाढली असल्याचे दिसत होते. रूटने सिराजने टाकलेला चेंडू गली एरियात मारला आणि तिथे फिल्डिंगसाठी रवींद्र जडेजा उभा होता. जडेजाने चपळाईने हा चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईकला फेकला. पण चेंडू काही विकेटचा वेध घेऊ शकला नाही. पण हे सर्व घडत असताना मिड ऑनवर असलेला अंशुल कंबोज धावत नॉन स्ट्राईकला येऊ शकला असता. पण त्याच्याकडून तसे काही करण्यात आले नाही. तसं पाहीलं तर जो रूट हा क्रिजपासून खूप लांब असलयाचे दिसत होते. त्यामुळे रवींद्र जडेजाचा पारा जास्तच चढल्याचे दिसले. त्याने कंबोजला काही तरी बोलून देखील दाखवले. त्याच्या हावभावावरून जडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) July 25, 2025
हेही वाचा : IND vs ENG : Joe Root ची गाडी काही थांबेना! मँचेस्टरमध्ये रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला जगातील पहिला फलंदाज
जो रूटने भारताविरुद्ध मैदानात ठिय्या मारला आहे. त्याने शतक झळकवून भारताला चांगलेच अडचणीत आणले आहे. या दरम्यान इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज जो रूटने इतिहास रचला आहे. त्याने जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडीत काढण्याबरोबर त्याने १२० धावा काढत रिकी पॉन्टिंगचा देखील विक्रम मोडला आहे. जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने मँचेस्टरमध्ये ही विक्रमी कामगिरी केली आहे.