फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या चौथा कसोटी सामना सुरु झाला आहे, या मालिकेमध्ये भारताच्या संघाने नाणेफक गमावले आणि टीम इंडीयाला फलंदाजी पहिल्या इंनिगमध्ये करायची आहे. भारताच्या संघाने पहिल्या सेशनमध्ये एकही विकेट गमावला नव्हता. भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली आणि संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यत इंग्लडच्या हाती ४ विकेट्स लागले आहेत. आता इंग्लडच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना बुधवारपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू झाला. या सामन्यात सुद्धा भारताच्या संघाने नाणेफेक जिंकले नाही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी त्यांचे प्लेइंग-११ जाहीर केले. देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना बरेच वर्ष घाम गाळावा लागतो. परंतु काही खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अशाच एका खेळाडूने संघ सोडल्याची बातमी आहे.
IND vs ENG 4th Test : मैत्री असावी तर अशी… ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर शुभमन गिल पोहोचला रुग्णालयात!
इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. हा चौथा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण जर त्यांनी हा सामना गमावला तर ते मालिका जिंकू शकणार नाहीत. त्यानंतर मालिका बरोबरीत येण्याची शक्यताच राहील. भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा असेल आणि यासाठी त्यांनी प्लेइंग-११ मध्ये तीन बदल केले आहेत.
इंग्लडच्या संघामध्ये पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग असलेला वेगवान गोलंदाज जोस टंग याने संघ सोडला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचा भाग असलेला टंग तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर होताच टंगला इंग्लंड संघातून बाहेर काढण्यात आले. यामागील कारण म्हणजे काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याचा खेळ. तो साउथहॅम्प्टनला रवाना झाला जिथे तो नॉटिंगहॅम काउंटी चॅम्पियनशिपमध्ये हॅम्पशायरविरुद्ध खेळणार आहे. नॉटिंगहॅमशायरने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
Following the beginning of the fourth Rothesay Test at Old Trafford, Josh Tongue has been released from England duty to play for Nottinghamshire.
The fast bowler will join the ongoing match against Hampshire on arrival at Utilita Bowl.#HAMvNOT pic.twitter.com/cZUZ7LDACl
— Nottinghamshire CCC (@TrentBridge) July 23, 2025
“ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी नॉटिंगहॅमशायरकडून खेळण्यासाठी जॉश टँगला इंग्लंड संघातून काढसे आहे. हॅम्पशायरविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाज संघात सामील होईल,” असे काउंटीने लिहिले. टॉसपोर्टच्या वृत्तानुसार, चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान टंगने इंग्लंड संघ सोडला. टंगने पहिल्या दोन सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चच्या आगमनामुळे टंगला संघातून वगळण्यात आले. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यातही त्याला संघात स्थान मिळाले नाही.