Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG : शोएब बशीरच्या जागेवर इंग्लंडचा हा खेळाडू खेळणार! मॅचेस्टर कसोटीसाठी केली प्लेइंग 11 ची घोषणा

इंग्लंड संघाने आता मॅचेस्टर कसोटी आधी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे, शोएब बशीर या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी इंग्लंडने आठ वर्षांनंतर एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2025 | 10:01 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची प्लेइंग-११ : इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीसाठी भारत काही तासातच मॅचेस्टरमध्ये सामना खेळताना दिसणार आहे. 23 जुलै रोजी बुधवारी दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. लॉर्ड्स कसोटी नंतर भारतीय संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इंग्लंड संघाने आता मॅचेस्टर कसोटी आधी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे, शोएब बशीर या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी इंग्लंडने आठ वर्षांनंतर एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. उर्वरित संघात इतर कोणताही बदल केलेला नाही.

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बशीरला दुखापत झाली होती. त्याने सामन्यातील शेवटचे षटक टाकले आणि मोहम्मद सिराजची महत्त्वाची विकेट घेऊन भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. तथापि, तो वेदनांनी त्रस्त होता. यानंतर, ईसीबीने सांगितले होते की तो पुढील कसोटी सामन्यात खेळणार नाही.

India vs England U19 2nd Test : वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद! नमन पुष्पकने दाखवली जादू, वाचा सामन्याचा अहवाल

बशीरच्या जागी ईसीबीने लियाम डॉसनला संघात बोलावले होते. आठ वर्षांनी तो प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवू शकेल असे मानले जात होते आणि तेच घडले आहे. बेन स्टोक्सने प्लेइंग-११ मध्ये डॉसनची निवड केली आहे. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने २०१६ मध्ये चेन्नई येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने जुलै २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

डॉसनने आतापर्यंत इंग्लंडसाठी फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारताविरुद्ध पहिला सामना खेळला ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात ६६ धावा केल्या आणि संपूर्ण सामन्यात एकूण दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर, त्याने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅटने प्रभावी कामगिरी करून डॉसनने संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय इंग्लंडने संघात इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. बशीर व्यतिरिक्त, लॉर्ड्समध्ये असलेले १० खेळाडू अजूनही संघात आहेत.

Our XI for the fourth Test is here 📋 One change from Lord’s 👊 — England Cricket (@englandcricket) July 21, 2025

भारतीय संघाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची प्लेइंग-११

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर

Web Title: Ind vs eng liam dawson will play in place of shoaib bashir england playing 11 announced for manchester test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team England

संबंधित बातम्या

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
1

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
2

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
3

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
4

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.