
photo- social media
भारत आणि इंग्लंड यांच्यात १४ जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. पहिला एकदिवसीय सामना १४ जुलै रोजी एड्जबॅस्टन येथे खेळलाजाईल. दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफ येथे तर तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर खेळला जाईल. सध्या दोन्ही संघांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या संघात जोस बटलर, आदिल रशीद, सॅम करन, जो रूट आणि विल जॅक्स यांसारख्या खेळाडूंचा समावेश केला आहे. बेन डकेट, टॉम बँटन आणि विल जॅक्स हे तीन सलामीचे फलंदाज आहेत. तर, जोफ्रा आर्चर, जोश टंग, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद आणि सॅम करन. रेहान अहमद आणि आदिल रशीद हे दोन फिरकी गोलंदाज आहेत. इंग्लिश संघात एका नवीन चेहऱ्याचाही समावेश करण्यात आला आहे. युवा फिनिशर जेम्स कोल्सला इंग्लंडच्या एकदिवसीय संघात पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. शुभमन गिल संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट, जोश टंग.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेट कीपर), वॉश्गिंटन सुंदर, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार.