फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लंड : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामनांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये भारताचा संघ रोहित शर्माचे निवृत्तीनंतर आता शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा भारतीय नियमक मंडळाने केली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने घोषणा केलेल्या संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंची चेहरे पाहायला मिळाले आहेत. भारताचे संघामध्ये कोणत्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार यासंदर्भात जाणून घ्या.
भारताचा अ संघ हा इंग्लंडला मालिकेसाठी रवाना झाला आहे. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन हा करणार आहे. यामध्ये भारताच्या मुख्य संघांमध्ये सामील झालेल्या करून नायर, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, शार्दुल ठाकूर हे खेळाडू 30 मे पासून इंग्लड अ विरुद्ध खेळणार आहेत. भारतीय संघामध्ये अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, अर्शदीप सिंग हे नवे खेळाडु पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर करून नायर देखील आठ वर्षानंतर पुन्हा भारतीय संघांमध्ये पाहायला मिळणार आहे.
भारतासाठी इंग्लडविरुद्ध श्रिशतक झळकावणाऱ्या करून नायरला भारतीय संघामध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्याला मागिल म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये देखील त्याला कोणत्याही संघामध्ये ऑक्शनमध्ये घेतले नाही. त्याला या सीजनमध्ये आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने संघामध्ये घेतले होते पण सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर फाफ डुप्लेसी हा जखमी झाल्यामुळे त्याला त्याच्या जागेवर संधी देण्यात आली होती, त्याने पहिल्या त्याच्या सामन्यात कमलीची खेळी खेळली होती, त्यानंतर मध्ये काही सामने तो विशेष कामगिरी करू शकला नाही, पण दिल्ली कॅपिटल्सच्या शेवटचे सामन्यामध्ये आणखी एकदा चांगली खेळी खेळली.
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिंधू, जसप्रीत अकरा, दीप सिंह, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, कृष्णा कुलदीप यादव