Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Ind vs Eng under 19 : Vaibhav Suryavanshi नावाची रनमशीन थांबेना! इंग्लंडमध्ये रचला इतिहास, युवा वनडेमध्ये ठोकले सर्वात जलद शतक

वैभव सूर्यवंशी आता इंग्लंडच्या भूमीवर आपल्या बॅटने जलवे करत आहे. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध अवघ्या ५२ चेंडूत शतक पूर्ण करून अंडर-१९ युवा एकदिवसीय सामन्यात मोठा पराक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 05, 2025 | 06:04 PM
Ind vs Eng under 19: Vaibhav Suryavanshi, the run machine, is unstoppable! Created history in England, scored the fastest century in youth ODIs

Ind vs Eng under 19: Vaibhav Suryavanshi, the run machine, is unstoppable! Created history in England, scored the fastest century in youth ODIs

Follow Us
Close
Follow Us:

 Ind vs Eng under 19 : आयपीएल २०२५ चा हंगाम गाजवणारा वैभव सूर्यवंशी आता इंग्लंडच्या भूमीवर आपल्या बॅटने कहर करत आहे. त्याची कीर्ती शिखरावर आहे. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध अवघ्या ५२ चेंडूत शतक पूर्ण करून इतिहास लिहिला आहे.  यादरम्यान वैभवने १९२.३१ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. त्याने या खेळीत १० चौकार आणि ७ षटकार लगावले आहेत. यासह, त्याने मोठी कामगिरी केलीय आहे. तो अंडर-१९ युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

वैभव सूर्यवंशीने शनिवारी (५ जुलै) युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावले आहे. या कामगिरीने त्याने इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव लिहिले आहे. १४ वर्षीय सूर्यवंशीने भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध  ५२ चेंडूंचा सामना करून पहिले शतक साकारले आहे. त्याने अवघ्या १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा : IND VS ENG : यशस्वी जयस्वालचा फॉर्म सुसाट! दिग्गज गावस्करांचा विक्रम मोडला, असे करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू..

१९ व्या षटकातच पूर्ण केले शतक

१४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजीचा नमूना पेश करून सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने  इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. १९ व्या षटकात फिरकी गोलंदाज राल्फी अल्बर्टच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन त्याने आपल्या शतकाला गवसणी घातली आहे. चौथा सामना भारत अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ यांच्यात वॉर्सेस्टर येथे खेळवला जात आहे. या मालिकेत, वैभवने पहिल्या सामन्यात ४८, दुसऱ्या सामन्यात ४५ आणि तिसऱ्या सामन्यात ८६ धावा फटकावल्या होत्या. पहिल्या दोन सामन्यात वैभव अर्धशतक पूर्ण करू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो आपल्या शतकापासूनही हुकला.  पण चौथ्या सामन्यात मात्र, वैभवने कोणतीही चूक न करता आपले शतक पूर्ण केले आणि इतिहास रचला.

त्याने फक्त २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील ५० धावा त्याने २८ चेंडूंमध्ये काढल्या.  सूर्यवंशीपूर्वी, युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या कासिम अक्रमच्या नावावर जमा होता. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी नॉर्थ साउंड येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तान-श्रीलंका सामन्यादरम्यान, त्याने ६३ चेंडूंचा सामना करत १०० धावांचा टप्पा पार केला होता.

हेही वाचा : IND Vs ENG : जेमी स्मिथने रचला इतिहास! इंग्लंडसाठी केला ‘हा’ पराक्रम; असे करणारा ठरला पहिला यष्टिरक्षक फलंदाज

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने २ जुलै रोजी नॉर्थम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात फक्त ३१ चेंडूत ८६ धावा केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ३४ चेंडूत ४५ धावा आणि पहिल्या सामन्यात १९ चेंडूत ४८ धावा फटकावल्या होत्या.

Web Title: Ind vs eng under 19 vaibhav suryavanshi creates history in england scores fastest century in youth odis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
1

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?
2

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.