Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Vaibhav Sooryavanshi: आपल्या लहानशा करिअरमध्ये अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करून घेतेले आहेत. हे रेकॉर्ड इतक्यात तोडणे कठीण असल्याचं दिसून येत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 02, 2026 | 10:48 AM
वैभव सूर्यवंशीचे ६ ऐतिहासिक रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीचे ६ ऐतिहासिक रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीची धुवाँधार खेळी 
  • अवघ्या १५ व्या वर्षी अनोखे रेकॉर्ड्स 
  • ६ ऐतिहासिक रेकॉर्ड्स तोडणे असंभव 
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने अगदी लहान वयातच क्रिकेट विश्वात मोठे यश मिळवले आहे. तो खेळत असलेल्या प्रत्येक मालिकेत किंवा स्पर्धेत एक मोठा विक्रम प्रस्थापित करतो. आपल्या लहान कारकिर्दीत, वैभव सूर्यवंशीने असे सहा विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याने जगातली प्रत्येकाला आपला फॅन करून घेतलंय असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. 

वैभव सूर्यवंशीला वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या लीग, आयपीएलमध्ये घेण्यात आले आणि तिथूनच त्याची प्रतिभा दिसू लागली. राजस्थान रॉयल्सने वैभवची खेळण्याची क्षमता ओळखून त्याला संधी दिली आणि त्याने संधीचे सोने केले. वैभवने आयपीएलमध्ये आधीच अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारतीय फलंदाज आहे. आज, अव्वल गोलंदाजही वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करण्यास घाबरतात. कारण त्यांच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याची वैभवची क्षमता आहे. 

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची चमक

आयपीएल, इंडिया ‘अ’ आणि १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर, वैभव सूर्यवंशी आता लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्येही आपली छाप सोडण्यास सज्ज आहे. वैभवने दुलीप ट्रॉफीमध्येही इतिहास रचला आहे. दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि १५७ दिवसांत अर्धशतक झळकावून, या स्पर्धेत सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. वैभव सूर्यवंशीने ४२ चेंडूंमध्ये हे अर्धशतक पूर्ण करून ५७ वर्षे जुना विक्रम मोडला.

कोणते आहेत वैभव सूर्यवंशीचे सहा अभेद्य विक्रम

  • टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज – १४ वर्षे ३२ दिवस
  • लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज – १४ वर्षे २७२ दिवस
  • लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक – ११ चेंडू
  • भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण – १५ वर्षे ९९ दिवस
  • टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात तरुण अर्धशतक
  • दुलीप ट्रॉफीमधील सर्वात तरुण अर्धशतक
वैभव सूर्यवंशीची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्याला या विक्रमांसाठी जास्त काळ वाट पाहावी लागली नाही. लहान वयातच त्याने आयपीएलपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपर्यंत आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे.

‘त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे…’, वैभव सूर्यवंशी-यशस्वी जायसवालच्या वागण्यावर भडकले Sanjay Manjrekar, कडक नियमांची मागणी

वैभववर अनेक गोष्टींचे प्रेशर 

वैभव अत्यंत लहान खेळाडू आहे. मात्र त्याच्यावर सर्व स्तरातून एक प्रेशर निर्माण करण्यात येत आहे असं अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा यासाठी आतापर्यंत अनेकांनी ट्विटही केलंय आणि काही दिग्गजांनी मुलाखतींमधूनही आपलं मत मांडलं आहे. मात्र वैभव सूर्यवंशी या सर्वांपासून अनभिज्ञ स्वतःचे काम करताना दिसून येत आहे. अनेकदा तो मुलाखतीमध्ये हेदेखील सांगतो की, मला कोणतेही कोणाचेही रेकॉर्ड माहीत नसतात, त्यामुळे सहजपणाने खेळणं हे एकच लक्ष्य असतं आणि टीमला जिंकवून देणं हेच ध्येय असतं. वैभव असाच खेळत राहिल्यास भल्याभल्यांचे रेकॉर्ड तो कमी वयात तोडेल हे काही वेगळं सांगायला नको! 

Web Title: Vaibhav sooryavanshi made 6 historical records impossible to break

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • duleep trophy 2026
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
1

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
2

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला
3

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
4

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.