
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Pakistan and Namibia, Salman Ali Agha Video : पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातील सामना १८ फेब्रुवारी रोजी खेळला गेला. पाकिस्तानने १०२ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने १०० धावांची शानदार खेळी केली. सलमान अली आगा यांनीही फरहानला साथ दिली. मात्र, तो ३८ धावांवर बाद झाला. यानंतर, डगआउटमध्ये बसलेला असताना, माइक हेसन त्याला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान त्याने पाण्याची बाटली फेकली आणि मोठ्याने ओरडतानाही दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान खान डगआउटमध्ये खूप अस्वस्थ दिसत आहे. माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज बाबर आझम त्याच्या शेजारी बसला होता. व्हिडिओमधील ऑडिओ अस्पष्ट असला तरी, अर्धशतक हुकल्याने तो स्वतःवर रागावलेला दिसत होता. आघा यांनी निराश होऊन बाटली फेकली तेव्हा पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन आश्चर्यचकित झाले. हेसनने त्याला शांत राहण्यास सांगितले, ज्याला आघा यांनी मान हलवली.
T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरूवात! वाचा विश्वचषकाचे सुपर 8 चे वेळापत्रक
बुधवारी (१८ फेब्रुवारी) कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेलेला सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती होती. त्यांच्यासाठी साहिबजादा फरहानने शानदार शतक झळकावले आणि लहान संघाविरुद्ध आपली ताकद दाखवली. फरहानने ५८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. कर्णधार सलमान अली आघा यांनी २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि शादाब खानने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
What happened there? pic.twitter.com/rlvgNgEgPx — Huzaifa khan (@HuzaifaKhan021) February 18, 2026
असेही म्हटले जात आहे की बाबर आझमला चौथ्या क्रमांकावर न पाठवल्याने सलमान अली आगा नाराज होते. सलमान बाद झाल्यानंतर ख्वाजा नाफेला मैदानात पाठवण्यात आले. ख्वाजा ५ चेंडूत फक्त ५ धावा करू शकला. त्याच्या पाठोपाठ शादाब खानला मैदानात पाठवण्यात आले. शादाबने १ चौकार आणि ३ षटकार मारून पाकिस्तानला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. बाबरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तरीही तो फलंदाजी करू शकला नाही. या विजयासह, पाकिस्तानने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप बी मध्ये, सुपर ८ मध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेशी होईल.