Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.  

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 10:43 PM
IND vs NED, T20 World Cup 2026: India became the 'King' in Ahmedabad! Netherlands were defeated by 17 runs; Chakraborty took 3 wickets

IND vs NED, T20 World Cup 2026: India became the 'King' in Ahmedabad! Netherlands were defeated by 17 runs; Chakraborty took 3 wickets

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NED, T20 World Cup 2026  : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत  आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारत ग्रुप A मध्ये अपराजित राहिला.  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. तर नेदरलँड्स संघ २० षटकात ७ विकेट्स गमावून १७६ धावाच करू शकला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : PAK vs NAM, T20 World Cup : पाकिस्तानची एक्सप्रेस सुपर 8 मध्ये दाखल! टी-20 विश्वचषकात नामिबियाला 102 धावांनी चारली धूळ

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा लागोपाठ तिसऱ्या वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी ३९ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले, दरम्यान इशान किशन  १८ धावा करून माघारी गेला. त्यानंतर तिलक वर्मा २७ चेंडूत ३१ धावा करून माघारी गेला. कर्णधार सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले.  त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. शिवम दुबेने ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर हार्दिक पंड्या २१ चेंडूत ३१ धावा केल्या आणि संघाचा डाव १९३ धावांपर्यंत पोहचवला. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकने ३ विकेट्स घेतल्या. तर आर्यन दत्तने २ विकेट्स घेतल्या. काइल क्लेनने १ विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ३५ धावांवर संघाने आपला पहिला गडी गमावला. मॅक्स ओ’डॉड २० धावा कडून बाद झाला. त्यानंतर नेदरलँड्स संघाच्या विकेट्स जात राहिल्या.  मायकेल लेविट २४ धावा, बास डी लीडे ३३ धावा, कॉलिन अ‍ॅकरमन २३ धावा करून बाद झाले. भारतीय गोलंदाजांनी नेदरलँड्स संघाला कोणतीच संधी दिली नाही. आर्यन दत्त भोपळा न फोडता माघारी गेला. स्कॉट एडवर्ड्स १५ धावा करून बाद झाला. झॅक लायन-कॅचेट २६ धावा केल्या. नोआह क्रोस २५ धावांवर तर लोगन व्हॅन बीक ४ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सारवधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने २ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि  हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार; हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

नेदरलँड्स प्लेइंग इलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अ‍ॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), झॅक लायन-कॅचेट, नोआह क्रोस, रोएलॉफ व्हॅन डेर मेरवे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन

भारत प्लेइंग इलेव्हन : इशान किशन (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

Web Title: Ind vs ned t20 world cup 2026 india thrash netherlands by 17 runs in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:40 PM

Topics:  

  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral
1

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
2

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.