Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉर्म की क्लास महत्वाचा? वर्ल्डकप विजेत्या Suryakumar Yadav चे करियर BCCI संपवणार? वाचा सविस्तर…

Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे आंतरराष्ट्रीय करिअर सध्या कठीण वळणावर असल्याचे बोलले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 02:39 PM
भारतीय संघात सूर्यकुमारला स्थान मिळण्याची शक्यता कमी 

भारतीय संघात सूर्यकुमारला स्थान मिळण्याची शक्यता कमी 

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघात सूर्यकुमारला स्थान मिळण्याची शक्यता कमी 
  • सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने जिंकला टी 20 वर्ल्डकप 
  • बीसीसीआयच्या सिलेक्शन प्लॅनमध्ये नाव नसल्याची चर्चा 
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव भारताचा अत्यंत प्रतिभावान आणि चांगला खेळाडू आहे. टी 20 मध्ये भारताने या वर्षी त्याच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला आहे. मात्र त्यानंतर त्याचा गेलेला फॉर्म आणि अन्य कारणांमुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. अद्याप देखील त्या टी 20 संघात स्थान मिळालेले नाहीये. त्यातच आता बीसीसीआयच्या सिलेक्शन प्लॅनिंगमध्ये सूर्यकुमार यादवचे नाव नसल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे आंतरराष्ट्रीय करिअर सध्या कठीण वळणावर असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या अहवाल आणि माहितीनुसार, बीसीसीआयच्या आगामी सिलेक्शन प्लॅनिंगमध्ये त्याचे नाव नसल्याचे समोर येत आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या केवळ अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पूर्ण सत्य हे अधिकृत माहिती समोर आल्यावरच संजू शकणार आहे.

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन

भारतीय संघाच्या सध्या प्लॅनिंगमध्ये सूर्यकुमार यादव फिट होत नसल्याचे म्हटले जात आहे. संघात युवा आणि आक्रमक फलंदाजांना संधी देणे कठीण होत असताना सूर्यकुमार यादवला संघात कसे समाविष्ट करायचे, असा प्रश्न निवडकर्त्यांसमोर असल्याचे म्हटले जात आहे. संघाची रचना, फलंदाजीचा क्रम आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेता सध्याच्या समीकरणांमध्ये त्याला स्थान देणे आव्हानात्मक ठरत असल्याचे समोर येत आहे.

सूर्यकुमार यादवने भारतीय संघाला 2026 मध्ये म्हणजेच यंदा टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे. मात्र त्यानंतर त्याच्या करियरमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. जून 2026 मध्ये निवड समितीने त्याच्याकडून टी 20 संघाचे कर्णधारपद काढून घेतले. तर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात देखील त्याला निवडले गेले नाही. यांमगे त्याचा वर्ल्डकप नंतर फॉर्म नसल्याचे कारण असल्याचे म्हटले जाते. मात्र एखाद्या अनुभवी खेळाडूला केवळ फॉर्म नाही म्हणून इतके दिवस संघाबाहेर ठेवणे कितपत योग्य आहे? वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला असे बाहेर ठेवणे योग्य आहे का? असे प्रश्न क्रीडा वर्तुळातून उमटू लागले आहेत.

आला रे आला! Suryakumar Yadav ची बॅट तळपणार! Syed Mushtaq Ali Trophy त ‘या’ संघाचे करणार नेतृत्व

भारतीय संघातून बाहेर काढले गेल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवने हार मानली नाहीये. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने त्याचा क्लास आणि फॉर्म दाखवून दिला आहे. सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत सूर्यकुमार मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्यकुमार यादवला भारतीय टी-20 संघातून का वगळण्यात आले होते?

    Ans: सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे आणि अन्य कारणांमुळे त्याला भारतीय टी-20 संघातून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: बीसीसीआयच्या आगामी सिलेक्शन प्लॅनिंगमध्ये सूर्यकुमार यादवचे नाव आहे का?

    Ans: बीसीसीआयच्या आगामी सिलेक्शन प्लॅनिंगमध्ये सूर्यकुमार यादवचे नाव नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Some reports bcci dont gave chance to suryakumar yadav for t20 team in india end career breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs NZ Weather Update: वेलिंग्टनच्या वेगवान हवेत सुरू होणार महामुकाबला! पाच दिवस कसे राहणार हवामान?
1

IND vs NZ Weather Update: वेलिंग्टनच्या वेगवान हवेत सुरू होणार महामुकाबला! पाच दिवस कसे राहणार हवामान?

IND vs NZ 1st Test: गजर लावायला विसरू नका! भल्या पहाटे सुरू होणार भारत-न्यूझीलंडचा पहिला कसोटी सामना, कुठे पहाल?
2

IND vs NZ 1st Test: गजर लावायला विसरू नका! भल्या पहाटे सुरू होणार भारत-न्यूझीलंडचा पहिला कसोटी सामना, कुठे पहाल?

Team India ला मोठा दणका; न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात झाली ‘ही’ चूक; आयसीसीने केली कारवाई
3

Team India ला मोठा दणका; न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात झाली ‘ही’ चूक; आयसीसीने केली कारवाई

IPL 2027 Auction: कोण होणार मालामाल? कधी कुठे अन् किती वाजता होणार लिलाव? BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय
4

IPL 2027 Auction: कोण होणार मालामाल? कधी कुठे अन् किती वाजता होणार लिलाव? BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.