Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही’; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यामागे हिंदू-मुस्लिम मुद्दा नसल्याचे गौतम गंभीर यांचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी स्पष्ट केले. पृथ्वी शॉचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनीही क्रिकेटमध्ये राजकारणाला जागा नसल्याचे सांगितले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 20, 2026 | 07:02 PM
Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही'; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप

Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही'; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप

Follow Us
Follow Us:
  • खासदार इमरान मसूद यांच्या विधानामुळे वाद
  • पृथ्वी शॉच्या प्रशिक्षकांचाही मसूद यांच्या विधानाला विरोध
  • क्रिकेटमध्ये राजकारणाला जागा नाही
 

Mohammed Siraj : न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला वगळण्यात आल्यावरून सुरू झालेल्या वादात आता प्रशिक्षकांनीही उडी घेतली आहे. भारतीय संघाच्या निवडीमागे कोणताही हिंदू-मुस्लिम मुद्दा नसून, संघाचे कॉम्बिनेशन आणि क्रिकेटची गरज लक्षात घेऊनच निर्णय घेतले जातात, असे गौतम गंभीर यांचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी स्पष्ट केले.
तसेच क्रिकेटपटू पृथ्वी शॉचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनीही धार्मिक मुद्दा उपस्थित करणाऱ्या विधानांना निराधार ठरवले आहे.

काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल धार्मिक मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना संजय भारद्वाज म्हणाले, हे आरोप निराधार आहेत. भारतीय क्रिकेट संघात कोणताही हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही. प्रत्येक खेळाडू भारतीय आहे आणि देशाचे प्रतिनिधित्व करतो. गौतम गंभीर यांनी नेहमीच मोहम्मद सिराजला पाठिंबा दिला आहे. सिराज प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल, तर त्यामागे पूर्णपणे संघाची गरज आहे.

संघाची निवड करताना खेळाडूंचे कॉम्बिनेशन, त्यांची भूमिका आणि कामगिरी यांचा विचार केला जातो. गंभीर यांची कोणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही. योग्य कॉम्बिनेशनसह मजबूत संघ तयार करणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. BCCI देखील हिंदू-मुस्लिम विभाजनावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे असे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असे भारद्वाज यांनी सांगितले.

IND Vs NZ: क्रिकेटविश्वात हाहा:कार! ‘सिराजला वगळण्यासाठी तब्बल महिनाभर…’; R. Ashwin चे विधान नेमके काय?

क्रिकेटमध्ये राजकारणाला जागा नाही

पृथ्वी शॉचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनीही सिराजच्या संघ निवडीवरून सुरू असलेल्या धार्मिक चर्चेला विरोध केला. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, सिराजला संघाबाहेर ठेवण्यावरून सुरू असलेली चर्चा निराधार आहे. त्याला ODI सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. तो अजूनही संघाचा भाग आहे. त्याच्याबाबत केली जाणारी राजकीय विधाने चुकीची आहेत. क्रिकेटमध्ये राजकारणाला कोणतेही स्थान नाही.

SA vs BAN: बांग्लादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले ODI -T20 संघ! केशव महाराज कर्णधारपदी; ३ वर्षांनंतर स्टार गोलंदाजाचे कमबॅक

इमरान मसूद यांच्या विधानामुळे वाद

काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे नाव सिराज आहे, हेच कारण पुरेसे नाही का? तो चांगली कामगिरी करत असूनही त्याची निवड होत नसेल, तर त्यामागे दुसरे कोणते कारण असू शकते? असे विधान मसूद यांनी केले होते.

सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) चक्रात सिराज हा भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप आणि अंशुल कंबोज यांना संधी दिली आहे. बुमराह वगळता इतर गोलंदाजांना सिराजच्या तुलनेत कमी अनुभव असल्याने त्याच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली. त्यातच इमरान मसूद यांच्या विधानामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग मिळाला आहे.

दरम्यान, सिराजच्या प्लेईंग इलेव्हनमधील अनुपस्थितीबाबत गुरुवारी काही क्रिकेट विश्लेषकांनीही प्रश्न उपस्थित केले होते. त्यात माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता. सिराज लयात असताना व दमदार कामगिरी करत असताना त्याला संघात संधी न मिळाल्याने त्यांनी संघ व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यावरून वाद का निर्माण झाला?

    Ans: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यावर काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी धार्मिक मुद्दा उपस्थित केल्याने वाद निर्माण झाला.

  • Que: गौतम गंभीर यांचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी काय म्हटले?

    Ans: सिराजला संघाबाहेर ठेवण्यामागे कोणताही हिंदू-मुस्लिम मुद्दा नसून, संघाची गरज आणि कॉम्बिनेशन लक्षात घेऊन निवड केली जाते, असे संजय भारद्वाज म्हणाले.

  • Que: सिराजच्या निवडीबाबत संतोष पिंगुळकर यांची भूमिका काय?

    Ans: सिराजला संघातून वगळण्यावरून सुरू असलेली चर्चा निराधार असल्याचे सांगत क्रिकेटमध्ये राजकारणाला जागा नसल्याचे पृथ्वी शॉचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mohammed siraj selection row no hindu muslim angle gautam gambhir coach rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs NZ
  • Mohammed Siraj

संबंधित बातम्या

Shashikant Shinde : खेळाडूंची निवड नावावरून नाही, गुणवत्तेवर; मोहम्मद सिराज प्रकरणी शशिकांत शिंदेंचे इमरान मसूद यांना प्रत्युत्तर
1

Shashikant Shinde : खेळाडूंची निवड नावावरून नाही, गुणवत्तेवर; मोहम्मद सिराज प्रकरणी शशिकांत शिंदेंचे इमरान मसूद यांना प्रत्युत्तर

IND Vs NZ: क्रिकेटविश्वात हाहा:कार! ‘सिराजला वगळण्यासाठी तब्बल महिनाभर…’; R. Ashwin चे विधान नेमके काय?
2

IND Vs NZ: क्रिकेटविश्वात हाहा:कार! ‘सिराजला वगळण्यासाठी तब्बल महिनाभर…’; R. Ashwin चे विधान नेमके काय?

IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड
3

IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड

IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?
4

IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.