IND vs SL 1st ODI Venue Changed
भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रथम एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर टी-२० मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना दिल्लीऐवजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल. हे दोन्ही संघ एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध खेळतील. प्रदूषणाची चिंता आणि प्रस्तावित नूतनीकरणाच्या कामामुळे डीडीसीएने बीसीसीआयला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) एका अधिकाऱ्याने सांगितले की, वाढते प्रदूषण आणि मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे त्यांनी बीसीसीआयला सामना दिल्लीबाहेर हलवण्याचे आवाहन केले होते. आता ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटची एकदिवसीय मालिका ऑगस्ट २०२४ मध्ये खेळली गेली, ज्यात श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. त्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला, तर श्रीलंकेने पुढील दोन सामने जिंकले.
Ans: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 13 डिसेंबर 2026 रोजी खेळवला जाणार आहे.
Ans: दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि अरुण जेटली स्टेडियमवरील प्रस्तावित नूतनीकरणाच्या कामामुळे पहिल्या वनडेचे ठिकाण बदलण्यात आले.
Ans: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.






