Andre Russell
आंद्रे रसेल नेपाळ प्रीमियर लीग २०२६ मध्ये बिराटनगर किंग्सकडून खेळत आहे. तो आता टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा आणि ५०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने यापूर्वीच ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता त्याने आपल्या १०,००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रसेल आता २१ व्या स्थानावर आहे.
या यादीत इंग्लंडचा जॉस बटलर पहल्या क्रमांकावर आहे. ज्याने १५,००० हून अधिक धावा केल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कायरोन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आजपर्यंत १४,९९९ धावा केल्या आहेत. रसेलसह केवळ सहा खेळाडूंनी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतले आहेत. तो लवकरच ५५० विकेट्सचा टप्पा गाठू शकतो.
आंद्रे रसेलची कारकीर्द आतापर्यंत शानदार राहिली आहे. त्याने टी-२० क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी ५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०३४ धावा केल्या आहेत आणि ७० विकेट्स घेतले आहेत. याशिवाय, त्याने ८५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११२२ धावा केल्या असून ६१ विकेट्स घेतले आहेत. तो वेस्ट इंडिजसाठी फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. त्याने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली असून, १३९ सामन्यांमध्ये २६५१ धावा केल्या आहेत आणि १२३ विकेट्स घेतले आहेत. रसेलने प्रामुख्याने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असून, त्याने ६५० हून अधिक टी-२० सामने खेळले आहेत.






