Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकवरही सस्पेन्स; पहिल्या T20साठी कोणते ११ शिलेदार मैदानात उतरणार?

IND vs NZ Probable Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत कोणाली संधी मिळणार, कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 04:56 PM
IND vs NZ Probable Playing 11

IND vs NZ Probable Playing 11

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या T20 साठी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
  • भुवी, वैभव अन् कुलदीपच्या जागेवर प्रश्नचिन्ह
  • अशी असेल टीम इंडियाची Playing 11
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका उद्यापासून खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरु होईल. या मालिकेत तब्बल ४ वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात भुवी मैदानात उतरणार का , याकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला आपल्या संधीची आणखी वाट पाहावी लागेल असे म्हटले होते. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?

वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार?

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी गेल्या काही काळापासून संघासोबत दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती, पण तो एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, वैभव सूर्यवंशीला सध्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये सहज स्थान मिळणे कठीण आहे. कारण अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीवीर म्हणून सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

वैभव सूर्यवंशीने यावर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून वैभवला फक्त आठच सामने खेळता आले आहेत. आशियाई खेळांदरम्यान, कर्णधार श्रेयसने वैभवला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, जेव्हा संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान, वैभवला पुन्हा एकदा अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यात आले.

भुवनेश्वर कुमार उद्या खेळणार?

अर्शदीप सिंग हा टीम इंडियाचा सध्या प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. प्रिन्स यादव आणि मयंक यादव या दोघांपैकी फक्त एकच खेळू शकतो. नितीश कुमार रेड्डी हा देखील वेगवान गोलंदाजीचा एक पर्याय आहे. भारतीय संघाने तीन मुख्य वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले तर भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते. त्याने गेल्या दोन आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली असून अखेरच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे, ज्यामुळे तो संघात स्थान मिळवण्यास पात्र ठरू शकतो. भारतीय संघ गेल्या काही काळापासून अखेरच्या षटकांमध्ये संघर्ष करत आहे आणि येथे भुवनेश्वर फायदेशीर ठरू शकतो.

कुलदीप यादवला संघाबाहेर बसणार?

फिरकी गोलंदाजी विभागात वरुण चक्रवर्तीचे पुनरागमन भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकते . दुखापतीमुळे तो २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकला नव्हता. त्याच्या पुनरागमनामुळे कुलदीप यादवला संघाबाहेर बसावे लागू शकते. अष्टपैलू नमन धीरलाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत सर्व पाच टी-२० सामने खेळले होते. मात्र, अक्षर पटेलसाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे सोपे नसेल.

पहिल्या टी२० साठी भारताचा संभाव्य 11

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वरुण चक्रवर्ती.

गोल्डन बॉईजचा जलवा! Asian Para Games मध्ये आयुष वर्माला सुवर्णपदक; प्रवीण कुमारने रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

Web Title: Ind vs nz 1st t20 probable playing 11 vaibhav bhuvneshwar kumar will get chance pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?
1

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?

IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’
2

IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT
3

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT

IND vs NZ: तब्बल ४ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक! कीवींच्या घरात Bhuvneshwar Kumar किती प्रभावी? पाहा T20I रेकॉर्ड
4

IND vs NZ: तब्बल ४ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक! कीवींच्या घरात Bhuvneshwar Kumar किती प्रभावी? पाहा T20I रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.