Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: तब्बल ४ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक! कीवींच्या घरात Bhuvneshwar Kumar किती प्रभावी? पाहा T20I रेकॉर्ड

Bhuvneshwar Kumar Record In New Zealand Ind vs Nz: भारतीय संघ या महिन्यापासून न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला या दौऱ्यासाठी संघात सामील करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 08:14 PM
Bhuvneshwar Kumar

Bhuvneshwar Kumar

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडमध्ये भुवनेश्वरसमोर मोठं आव्हान
  • जुनी आकडेवारी काय सांगते?
  • न्यूझीलंडमध्ये भुवनेश्वरची जादू चालणार?
Bhuvneshwar Kumar: भारतीय पुरुष क्रिकेट संघ आगामी मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. २२ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे संगात पुनरागमन झाले आहे. आयपीएल आणि यूपी टी २० लीगमधील आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. जवळपास चार वर्षांनंतर, भुवी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेत सर्वांचे लक्ष भुवनेश्वरवर असणार आहे. न्यूझीलंडमधील टी२० सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारची कामगिरी कशी राहिली आहे, जाणून घेऊयात. (Bhuvneshwar Kumar Record In New Zealand Ind vs Nz)

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

न्यूझीलंडमधील भुवनेश्वर कुमारची टी२० आकडेवारी

भुवनेश्वर कुमारची न्यूझीलंडमधील टी२० आंतरराष्ट्रीय कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही. त्याने न्यूझीलंडच्या भूमीवर पाच सामने खेळले आहे. यामध्ये त्याने केवळ चार विकेट घेतले आहेत. या काळात त्याने १९ षटके गोलंदाजी करत १६० धावा दिल्या. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ८.४० होता. कोणत्याही देशातील हा त्याचा सर्वात महागडा इकॉनॉमी रेट असल्याचे म्हटले जाते. न्यूझीलंडमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी ४०.०० आहे. या काळातील त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १२ धावांत एक विकेट अशी आहे. त्यामुळे, आगामी मालिकेत ही आकडेवारी सुधारण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.

भुवी हा टी-२० सामन्यांमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज

भुवनेश्वर कुमारची न्यूझीलंडमधील आकडेवारी कदाचित प्रभावी नसेल, पण त्याची एकूण टी२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच प्रभावी राहिली आहे. त्याने भारतासाठी ८६ डावांमध्ये ९० विकेट्स घेतले आहेत. या कामगिरीमुळे तो टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सातवा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याची कारकिर्दीतील गोलंदाजीची इकॉनॉमी रेट ६.९६ आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये दोनदा एका डावात पाच विकेट्सही घेतले आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी चार धावांत पाच विकेट्स आहे.

न्यूझीलंडमध्ये भुवी करणार जबरदस्त कमबॅक?

भुवनेश्वर कुमारने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत घेतलेल्या एकूण विकेट्सपैकी केवळ ४.४ टक्के विकेट्स न्यूझीलंडमध्ये घेतले आहेत. भुवीची ताकत स्विंग आणि अचूक लेन्थ- लाइनवर गोलंदाजी करणए आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून तो विरोधी फलंदाजांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. आयपीएल आणि यूपी टी२० लीगमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, भुवीची आंतरराष्ट्रीय संघात निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत

Web Title: Ind vs nz bhuvneshwar kumar t20i record in new zealand pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • New Zealand Cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत
1

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत

IND vs NZ: वेस्ट इंडिज सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार; T20, वनडे अन् कसोटीचा थरार रंगणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
2

IND vs NZ: वेस्ट इंडिज सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार; T20, वनडे अन् कसोटीचा थरार रंगणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Hong Kong Sixes 2026: क्रुणाल पांड्या बनला टीम इंडियाचा कॅप्टन; भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूची एन्ट्री
3

Hong Kong Sixes 2026: क्रुणाल पांड्या बनला टीम इंडियाचा कॅप्टन; भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूची एन्ट्री

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…
4

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.