
IND vs NZ 1st T20I: The Kiwi team is ready to continue its winning streak! New Zealand won the toss and elected to bowl; Surya's army will bat.
IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज २१ जानेवारी रोजी नागपुर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारतीय संघ संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरणार आहे.
टॉस जिंकल्यावर न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे आणि येथे मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. मागचा आठवडा खूप खास होता. भारतात येऊन सामना जिंकणे किती कठीण आहे हे प्रत्येक संघाला माहित आहे, पण ही एक नवीन मालिका आहे आणि भारतीय संघ घरच्या परिस्थितीत एक मजबूत संघ आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने आमच्यासाठी ही एक उत्तम सुरुवात आहे. संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत. क्लार्क पदार्पण करत आहे, तसेच जेमिसन आणि डफी देखील खेळत आहेत.”
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस गमावला, त्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो, कारण आमच्या सरावादरम्यान रात्री ८.३० च्या सुमारास दव पडले होते असे आम्हाला जाणवले. पण आम्हाला प्रथम फलंदाजी करायलाही काही हरकत नाही आणि आम्ही प्रथम फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस, हर्षित, बिश्नोई आणि कुलदीप यांना आजच्या सामन्यात संधी मिळालेली नाही.”
Presenting #TeamIndia‘s Playing XI for the 1⃣st T20I 🙌 Updates ▶️ https://t.co/ItzV352OVv#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/t1BZ6pNUS0 — BCCI (@BCCI) January 21, 2026
हेही वाचा : WPL 2026 : दिल्लीच्या फलंदाजाला पंचांशी वाद भोवला! ‘या’ खेळाडूला ठोठावण्यात आली मोठ्या दंडासह शिक्षा
दोन्ही संघ खालीलप्रमाणे…
न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी
भारत संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह