Another Defeat for India at Home Ground Kiwis win by 113 runs 2-0 in Te series pocket
IND vs NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज न्यूझीलंडने पुन्हा एकदा टीम इंडियाला जेरीस आणले. ३५९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला हे लक्ष्य पेलवले नाही. भारताचा अर्ध्यापेक्षा अधिक संघ पॅव्हेलिनमध्ये परतला. भारताच्या १८० धावांवर ७ विकेट गेल्या आहेत. न्यूझींलडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला.
विराटची महत्त्वपूर्ण विकेट
The incredible 12-year streak has been brought to an end 🤯#indvsnz #India #NewZealand #ViratKohli #rohitsharma pic.twitter.com/LXCAhjID2L
— Cricbuzz (@cricbuzz) October 26, 2024
भारतीय संघाचे तब्बल ६ फलंदाज बाद
भारतीय संघाचे तब्बल ६ फलंदाज सॅंटनरने बाद केले, तर एजाज पटेलने २ विकेट घेत टीम इंडियाला धक्का दिला. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने १ विकेट घेतली. सॅंटनरने आज भारतीय फलंदाजी मोडीत काढली. टीम इंडियाचे सर्वाधिक फलंदाज सॅंटनरने बाद केले. सॅंटनरने काल ७ आणि आज ६ विकेट घेत एका कसोटीत तब्बल १३ विकेट घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट सुंदरने घेत्या. वाॅशिंग्टन सुंदरने तब्बल ११ विकेट या कसोटीत घेतल्या.
सॅंटनरने घेतल्या ६ विकेट
टीम इंडियाला सर्वाधिक फटका सॅंटनरने दिला. सॅंटनरने आज ५ विकेट घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. सॅंटनरने पहिल्यांदा रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डॅरेल मिचेलद्वारे शुभमन गिलला झेलबाद करीत पॅव्हेलीनमध्ये पाठवले. विराट कोहली पुन्हा एकदा सॅंटनरच्या ३० व्या ओव्हरमध्ये बाद झाला.
सॅंटनरने भारतीय फलंदाजी काढली मोडीत
सॅंटनरने विराटला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऋषभ पंत रनआऊट झाला. धमाकेदार गोलंदाजी करणारा सुंदर आज ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर बाद झाला. सरफराज खानला तर सॅंटनरने क्लिनबोल्ड करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. आजा रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन खेळतोय. रविचंद्रन अश्विन ५० व्या ओव्हरला सॅंटनरच्या चेंडूवर डॅरेल मिचेलच्या चेंडूवर झेलबाद झाला.
न्यूझीलंडने आज भारतीय संघाचा चकनाचूर केला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीपला एजाज पटेलने टीपले. एजाज पटेलच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याच्या नादात तो मिडआॅनला सोपा झेल देत बाद झाला.
आम्ही गेल्या ४ ते ५ वर्षांपासून चांगले क्रिकेट खेळतोय, एखाद वेळी असे होत असते
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आम्ही लागोपाठ एवढी चांगली क्रिकेट खेळलोय मागे आम्ही छान क्रिकेट खेळत होतो. एखादी सीरिज गेली तरी काय हरकत नाही. आम्ही सातत्याने सीरिज जिंकत आलो आहे. मग ही सिरीज हरल्यानंतर आम्ही काही उलटपुलट करणार नाही. सर्व खेळाडूंमध्ये चांगली क्वालिटी आहे, मी कोणाच्या अॅबिलीटीवर शंका घेणार नाही. हे होत असते. आम्ही कोणताही बदल करण्याच्या मनःस्थितीत नाही.
मी नेहमीच विजयाची भावना ठेवलीये
आम्ही नेहमीच कसोटी जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. टेस्ट मॅच अनिर्णित करून मग जिंकण्याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळे आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच टेस्ट खेळलोय.