Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 24, 2026 | 11:04 AM
कुठे आणि कधी पाहता येणार आजचा सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

कुठे आणि कधी पाहता येणार आजचा सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे
  • मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे स्टार फलंदाज इशान किशन या सामन्यातून बाहेर 
  • ईशानच्या जागी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची शक्यता आहे
IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडच्या पाच सामन्यांपैकी रोमांचक टी२० सिरीजचा दुसरा सामना आज  शनिवार २४ ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात रंगणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता हा खेळ सुरू होणार आहे. 

या सिरीजच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला असून सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. आता किवींची नजर हा सामना जिंकण्यावर असेल आणि सिरीज बरोबरीत पुढे नेण्यासाठी ते नक्कीच बाजी लावतील असा अंदाज आहे. पण भारतीय संघदेखील आपली पकड मजबूत करण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. कधी आणि कुठे होणार सामना जाणून घेऊया

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

त्याच मैदानावर सामना 

सिरीजचा पहिला सामनाही क्राइस्टचर्चच्या हेगल मैदानातच गुरूवारी खेळला गेला होता. या रोमांचक खेळात न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी केली आणि २२६ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १९.४ षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत २२६ धावांचे लक्ष्य पार केले होते. पण इशान किशनला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. 

ईशान किशन संघाबाहेर, युवा वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते

यावर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ईशान किशन, दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी निवडीकरिता उपलब्ध नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो शनिवारच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. 

वैभवने यापूर्वी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो डावाची सुरुवात करतो की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे, घरच्या मैदानावर प्रेक्षकांसमोर पहिला सामना गमावल्यामुळे न्यूझीलंड प्रचंड दबावाखाली आहे. किवी संघाने पहिल्या टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती, परंतु त्यांना ती वाचवता आली नाही. कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली, यजमान संघ या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?

कुठे आणि कधी पाहता येणार सामना 

भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १२.३० वाजता सुरू होणार असून सामना सुरू होण्याच्या ठीक ३० मिनिटे आधी, दुपारी १२:०० वाजता नाणेफेक होईल. भारतात, या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण शनिवारी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी टेन १ आणि सोनी टेन ३ या वाहिन्यांवर केले जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी२० सामना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल

  • Que: दुसरा टी२० सामना किती वाजता सुरू होईल?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. सामना सुरू होण्याच्या ठीक ३० मिनिटे आधी, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०० वाजता नाणेफेक होईल.

  • Que: भारतात हा सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल?

    Ans: भारतात, हा रोमांचक सामना शनिवारी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी टेन १ आणि सोनी टेन ३ या चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

Web Title: Ind vs nz 2nd t20 when and where to watch live streaming india vs new zealand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?
1

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार
2

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…
3

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय
4

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.