
IND vs NZ 2nd T20I: A sunrise after 14 months! Mr. 360 shines with a half-century! He took on the New Zealand bowling attack in Raipur.
IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत २०२८ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना इशान किशननंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील अर्धशतक पूर्ण केले. त्याने २३ चेंडूत ५० धावा केल्या.
हेही वाचा : विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ
भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. न्यूझीलंड संघाने रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या आणि भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य देण्यात आले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा भोपळा न फोडता माघारी गेला आणि संजू सॅमसन देखील ६ धावा करून माघारी गेला. त्यानंतर आलेला इशान किशनने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत डाव सावरला आणि जलद अर्धशतकही झळकवले. त्याने २१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. इशान आता ३१ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे. त्याला ईश सोढीने बाद केले. त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव २३ चेंडूत ५० धावा केल्या. पुढे त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. तो २९ चेंडूत ६४ धावांवर खेळत आहे. त्याच्या सोबत शिवम दुबे देखील शानदार फलंदाजी करत आहे. भारताला विजयासाठी २४ धावांचे गरज आहे.
Commanding the contest 🫡 2⃣2⃣nd T20I fifty for captain Surya Kumar Yadav 🙌#TeamIndia need 66 runs from 56 deliveries. Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar pic.twitter.com/LEjU1VcEra — BCCI (@BCCI) January 23, 2026
हेही वाचा : IND VS NZ: रायपूरमध्ये इशान किशनचे वादळ! चौकार-षटकरांची आतिषबाजी करत झळकवले जलद अर्धशतक
भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी