विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli’s decision to retire from Test cricket : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी हेऊन गेला आहे. तरी देखील अनेकांना वाटतं त्याने घेतलेला निर्णय हा घाईमध्ये वा इतरत्र दबावामुळे घेतलेला आहे. अजून देखील त्याच्या निवृत्तीभोवती वादविवाद सुरूच असलेले दिसून येत आहेत. अनेक माजी क्रिकेट दिग्गज खेळाडू त्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. तथापि, काही खेळाडू असे आहेत जे कोहलीच्या निवृत्तीमुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांनया अजून देखील असे वाटते की, कोहलीने रेड-बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन घाई केली आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याचे विधान पुढे आले आहे. त्याचा असा विश्वास आहे की कोहलीला कसोटी स्वरूपातून निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले आहे. हा त्याच्या मनाचा निर्णय नव्हता.
अलीकडेच, संजय मांजरेकर यांनी कोहलीबद्दल बोलताना म्हटले आहे की, विराट कोहलीने कठीण स्वरूपांपेक्षा सोप्या स्वरूपाची निवड केली आहे. तसेच इनसाइडस्पोर्टशी बोलताना तिवारीने त्याचे मत मांडले, “मी त्याच्याशी सहमत नाही. कोहलीला निवृत्त होण्यास भाग पाडले गेले आहे.”
मनोज तिवारी म्हणाला की, “असे वातावरण तयार करण्यात आले होते ज्यामुळे कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यास भाग पाडले गेले. तो अशा प्रकारचा माणूस नाही जो कधी निवृत्ती घ्यायची याबाबत ठरवू शकतो. हो, निवृत्तीचा निर्णय त्याच्या तोंडून आला. पण पडद्यामागील खरी कहाणी काय होती? हे सर्वांना माहिती आहे.”
तो पुढे म्हणाला की, “सर्व तथ्ये जाणून असताना देखील, त्याने कठीण स्वरूपापेक्षा सोपा स्वरूप निवडले असे तुम्ही कसे म्हणू शकता? मी मांजरेकर यांच्या विधानाशी सहमत नाही.”
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर
विराट कोहलीने मागील वर्षी १२ मे २०२५ रोजी अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाआश्चर्याचा धक्का दिला. त्याने टी२० स्वरूपाला देखील अलविदा म्हटले आहे. विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय स्वरूपामध्येच खेळत आहे.






