Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जडेजाने ३ विकेट घेत फिरवला सामना; संघाच्या आशा कायम; इंडियाला आता २४९ धावांची गरज, दुपारपर्यंत टीम इंडियाच्या ११२ धावा

पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरुव असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने ३ विकेट घेत सामना काही प्रमाणात भारताच्या बाजूने झुकवला. भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 26, 2024 | 05:38 PM
IND vs NZ 2nd Test 3rd Day Ravindra Jadeja took a crucial wicket turned the match around team's hopes alive huge target of 539 runs Team India 81 runs till afternoon

IND vs NZ 2nd Test 3rd Day Ravindra Jadeja took a crucial wicket turned the match around team's hopes alive huge target of 539 runs Team India 81 runs till afternoon

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 2nd Test 3 rd Day : न्यूझीलंडचा २५५ धावांवर आॅलआऊट झाला. त्यानंतर भारताने खेळायला सुरुवात केली रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली. भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य आहे. रोहित शर्माची विकेट सॅंटनरच्या चेंडूवर गेली. सॅंटनरच्या ५-४ चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. सॅंटनरचा एक चेंडू प्लेट करताना सोपा झेल देत रोहित बाद झाला.

यशस्वी जयस्वालचे दमदार अर्धशतकट

If Yashasvi jaiswal score Century I will give 999 Rupees to everyone who likes this tweet 🌟 🇮🇳 #indvsnz #indvnz #indvnew #YashasviJaiswal pic.twitter.com/ES9KwKA4P2

— Ashish (@SirAshu2002) October 26, 2024

सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने दमदार अर्धशतक ठोकत भारतीय संघ सावरला. भारतीय संघाला एका मोठ्या इनिंगची आवश्यकता आहे. जी यशस्वी जयस्वालने करून दाखवली. यशस्वीने दमदार खेळी करीत आतापर्यंत ७६ धावा केल्या आहेत. यशस्वीने भारतासाठी महत्त्वाची इनिंग खेळत किवींच्या गोलंदाजांचा घाम काढला.

दुपारपर्यंत भारताच्या ८१ धावा
दुपारच्या जेवणापर्यंत टीम इंडियाने ८१ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माची विकेट भारताने गमावली. आजदेखील रोहितला सूर गवसला नाही. एका सोप्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. यशस्वी जयस्वा ४६ धावांवर खेळतोय आणि शुभमन गिल सध्या २२ धावांवर खेळत आहे.

हेदेखील वाचा – IND W vs AFG W : एका षटकात 8 चेंडू आणि 31 धावा; IPL च्या राहुल चहरची इमर्जिंग आशिया चषकात जोरदार धुलाई

किवींची १९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात
आज न्यूझीलंडने १९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांच्या काल ५ विकेट गेल्या. परंतु आज त्यांची सुरुवात खराब करण्यात रवींद्र जडेजाचा महत्त्वाचा हात आहे. रवींद्र जडेजाने टॅा ब्लंडेलला त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. कारण तो एकमेव सेट फलंदाज होता. भारताने आतापर्यंत ५८ ओव्हर टाकल्या होत्या. रवींद्र जडेजा ५९ व्या ओव्हरला आला आणि त्याने टॅाम ब्लंडेलला क्लिन बोल्ड करीत घरचा रस्ता दाखवला. त्याच्याबरोबर ग्लेन फिलिप्स हा देखील होता. टॅाम गेल्यानंतर न्यूझीलंडच्या एकामागोमाग एक विकेट पडत राहिल्या. सॅंटनर, साऊथी, एजाज पटेल, विलियम रुरके स्वस्तात बाद झाले.

काल टीम इंडियाचा पहिला डाव उधळला

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव उधळला, अक्षरश: आज उधळला. मॅचेल सॅंटनरने भारतीय संघाचा निम्म्यापेक्षा अधिक संघ एकट्याने तंबूत धाडला. यामध्ये त्याने विराट, जडेजा, सरफराज, अश्विनसारख्या महत्त्वाच्या विकेट घेत टीम इंडियाला कमजोर केले. आर अश्विनलासुद्धा सॅंटनरने बाद केले. शेवटी आलेला आकाशदीपला मिचेल सॅंटनरने क्लिनबोल्ड केले.

शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने केली डावाची सुरुवात
रोहित शर्मातर कालच खाते न उघडता तंबूत परतला होता. दुसऱ्या दिवशी आज डावाची सुरुवात शुभमन शुभमन आणि यशस्वी जयस्वालने केली. या तरुण जोडीने डावाची सुरुवात केलेली असताना शुभमन गिल सुरुवापतीपासून चाचपडत खेळत असल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या सॅन्टनरने आज धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने २३.२ ओव्हरला शुभमन गिलला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला त्रिफळाचित करीत बाद केले. सॅन्टनरच्या २३.५ षटकांत विराट त्रिफळाचित झाला. विराट फुलटॅास आलेला चेंडूसुद्धा कळाला नाही. अवघ्या एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आला.

हेदेखील वाचा – VIDEO : ‘जरा हिरो बनू नकोस…’; रोहित शर्माने मैदानाच्या मध्यभागी कोणाला फटकारले? पाहा VIDEO

सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी ठरली फ्लाॅप
मागच्या कसोटीत धमाकेदार खेळी करणारा सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी आज पूर्ण फ्लॅाप ठरली. ऋषभ पंतला ग्लेन फिलिप्सने ३०.५ ओव्हरला क्लिनबोल्ड करीत घरचा रस्ता दाखवला. तर सरफराज खान सॅन्टनरच्या चेंडूवर मिडआॅनला एक सोपा झेल देत बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन सॅन्टनरच्या चेंडूवर एल्बीडब्ल्यू बाद झालला. त्यानंतर जड्डू आणि वाॅशिंग्टनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजा आणि सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु जडेजा सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर आकाशदीप सॅन्टनरच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.

सॅन्टनरने निम्मा संघ बाठवला तंबूत
भारतीय क्रिकेट टीमच्या आज लागोपाठ ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडकडून सॅन्टर टीम इंडियाला जखडून ठेवले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळपट्टीने फिरकीपटूंना चांगलीच साथ दिली आहे. च्या दिवसात रविचंद्रन अश्विननंतर वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार गोलंदाजीने किवींचा डाव उधळला आणि त्यांना २५९ धावांपार्यंतच रोखून धरले. सरफराज खानदेखील एक मोठा शॅाट मारण्याच्या नादात सोपा झेल मिडअॅानला देऊन बाद झाला. सॅन्टरने आज ४ विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुपारच्या सत्रापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यामुळे आता मॅच कुठपर्यंत चालते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सॅं

Web Title: Ind vs nz 2nd test 3rd day ravindra jadeja took a crucial wicket turned the match around teams hopes alive huge target of 539 runs team india 81 runs till afternoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • Mitchell Santner
  • Ravichandran Ashwin
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान
1

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

‘हँडशेक’ कॉन्ट्रोवर्सीवर वॉशिंग्टन सुंदरने सोडले मौन! म्हणाला – जेव्हा बरेच काही धोक्यात असते…
2

‘हँडशेक’ कॉन्ट्रोवर्सीवर वॉशिंग्टन सुंदरने सोडले मौन! म्हणाला – जेव्हा बरेच काही धोक्यात असते…

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..
3

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..

रवींद्र जडेजाने केली विश्वविक्रमाची बरोबरी, सुनील गावस्कर यांना मागे टाकुन बनला नंबर 1 भारतीय
4

रवींद्र जडेजाने केली विश्वविक्रमाची बरोबरी, सुनील गावस्कर यांना मागे टाकुन बनला नंबर 1 भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.